कृषी महोत्सवाच्या समारोपालाही शेतकèयांनी फिरवली पाठ

0
17

ढिसाळ नियोजनाच्या कृषी महोत्सवाने अधिकाèयांचे खिशे भरले

गोंदिया,दि.२१ः येथील जिल्हा क्रिडा संकुल परिसरात आयोजित कृषी महोत्सव व पलास प्रदर्शनाचा आज समारोप झाला.१७ फेबुवारीपासून सुरु झालेल्या या कृषी महोत्सवाच्या पाच दिवसात मात्र चार-पाच हजाराच्यावर नागरिकांनी भेटी दिल्या नसल्यातरी नोंदवहीमध्ये आकडा फुगविण्यासाठी वाढविलेल्या आकड्याने मात्र आयोजकांची फसवेगिरी उघडकीस आली.तर आजच्या समारोपीय सत्रामध्ये शेतकèयांसाठी आयोजित चर्चासत्रालाही जिल्ह्यातीलच काय आयोजनस्थळापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या गावखेड्यातील शेतकèयांनी पाठ फिरवल्याचे बघावयास मिळाले.कृषी महोत्सवाच्या आयोजनासाठी कृषी विभाग १४ लाख रुपये खर्च केल्याचे सांगत असले तरी मिळालेल्या माहितीनुसार कृषी विभाग १४ लाख,माविम,उमेद,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचा १० लाख आणि जिल्हा नियोजन विभागाने नाविन्यपुर्ण योजनेतही काही निधी अशा सुमारे ५० लाखाच्याजवळपासच्या निधीचे हे आयोजन असल्याची चर्चा समारोपप्रसंगी काही तज्ञ शेतकरी व स्टॉललावलेल्याकडून एैकावयास मिळाली.विशेष म्हणजे व्यवसायिक स्टालधारकाकडूनही चांगलीच वसुली करण्यात आली असली तरी शासकीय स्टॉल हे बिनकामाचेच असल्याचे पाचही दिवसात बघावयास मिळाले.तर कृषी विभागाने काही तरी आयोजन करायचे आहे हे त्या विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी मनात बांधून दिवस काढायचे म्हणूनच त्यांची त्यास्थळी हजेरी दिसून आली.सोबतच याठिकाणी सेंद्रीय तांदुळ,सेंद्रीय भाजीपाला आदींचे लावण्यात आलेल्या स्टॉलवरही शंका निर्माण झाली आहे.अवघ्या १ एकराच्या प्लाटवर एकच शेतकरी १० ते १२ प्रकारच्या भाजीपाल्याचे सेंद्रीय पिक घेतेय यावर अनेकांचा विश्वास बसत नव्हता तरी आयोजकांनी सेंद्रीयच्या नावावर अनेकांची फसवणूक तर केली नाही अशी स्थिती या कृषी महोत्सवात बघावयास मिळाले.जिल्हा कृषी अधिक्षक व आत्माचे प्रकल्प संचालक यांच्या मनमर्जी कारभारामूळेच या कृषी महोत्सावाकडे शेतकरी फिरकला नसून अशा अधिकाèयामूळेच हे आयोजन सपेशल अपयशी ठरल्याचा शिक्कामोर्तब अनेकांनी केले आहे.शेवटच्या दिवशी काही शाळेतील मुलांना महोत्सवामध्ये बोलावून गर्दी करण्याचा केविलवाणा प्रयत्न आयोजकांनी केल्याचेही बघावयास मिळाले.