कॉंग्रेसचे युवराज थायलंडमध्ये करताहेत ‘विपश्यना’, 15 मार्चला मायदेशी परतणार

0
13

नवी दिल्ली- कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत एक नवा खुलासा समोर आला आहे. राहुल गांधी संध्या थायलंडमध्ये असून तेस विपश्यना करत असल्याचे एका वृत्त वाहिनीने आपल्या वृत्तात म्हटले आहे. राहुल गांधी येत्या 15 मार्चला भारतात परत येणार असल्याचीही माहिती मिळाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी हे थायलंडमधील उबाना शहराजवळील एका बुद्ध मठात (मॉनेस्ट्री) विपश्यना करत आहे. 15 दिवसांचा कोर्स पूर्ण करून ते भारतात परतणार आहेत.
2012 पासून करताहेत विपश्यना…
राहुल गांधी मागील चार वर्षांपासून विपश्यना करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. राहुल पहिल्यांदा 2012 मध्ये म्यानमारमध्ये विपश्यनेसाठी गेले होते. यंगूनमधील एसएन गोयनका यांनी राहुल यांना विपश्यनेचे प्रशिक्षण दिले होते. राहुलयांच्या भगिनी प्रियांका गांधी- वढेरा यांनी देखील गोयनका यांच्याकडूनच विपश्यनेचे प्रशिक्षण घेतले होते. राहुल दर वर्षी विपश्यनेसाठी विदेश दौरा करत अवसल्याचे कॉंग्रेसच्या सूत्रांनी सांगितले आहे.
राहुल मायदेशी आल्यानंतर अनेक फेरबदल…
राहुल गांधी हे थायलंडहून परतल्यानंतर कॉग्रेसमध्ये मोठा फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 15 मार्चनंतर कॉग्रेसमध्ये केंद्र सरकारच्या मंत्रालयांच्या धर्तीवर वेग-वेगळे विभाग बनवले जातील. अर्थ, पर्यावरण सारख्या अनेक विभागांचे नेत्यांकडे नेतृत्त दिले जाणार आहे.

काय आहे विपश्यना?
विपश्यना ध्यान करण्याची एक पद्धत आहे. विपश्यनाचा इतिहास गौतम बुद्ध यांच्याशी संबंधित आहे.

दरम्यान, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सुटीवर गेले आहेत. ते कुठे गेले यावरुन रोज नवी माहिती पुढे येत असतानाच राहुल यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी ते भारतातच असल्याचे म्हटले होते.