नरेंद्र मोदींच्या मायावी चेहèयापासून सावध रहा-अ‍ॅड.गायकवाड

0
10

गोंदिया,दि.२३ :देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत मायावी जादूच्या माध्यमातून जनतेला फसवले आणि सत्ता मिळविली.आत्ता जनतनेच २०१९ च्या निवडणूकीत मोदींचा मायावी चेहèयापासून सावध राहण्याची वेळ आली आहे.त्यांचा खरा चेहरा संघाचा असून बाबासाहेब आंबेडकरांबद्दल प्रेमाचा आव आणत असले तरी चार वर्षात इंदू मिल येथील बाबासाहेबांच्या स्मारकाच्या जागेवर साधी विटही लागली नाही. ही सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात धूळफेक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. जयदेव गायकवाड यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.ते गोंदिया व भंडारा येथील विश्रामभवनात आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते.यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष पंडित कांबळे,जिल्हाध्यक्ष मनोज डोंगरे,प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे,अशोक शहारे,जितेंश टेंभरे,मामा बनसोड तर भंडारा येथील पत्रपरिषदेला खासदार मधुकर कुकडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव धनंजय दलाल, जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र वानखडे उपस्थित होते.
गायकवाड म्हणाले की सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या विभागात २००० कोटीचा शिष्यवृत्ती घोटाळा उघडकीस येऊनही त्यांनी त्याप्रकरणातील दोषींवर न केलेली कारवाई म्हणजे या घोटाळ्यात सरकारचाही सहभाग असल्याची टिका केली.सोबतच सरकारने बाबासाहेबांचे लंडन येथे स्मारक बनविण्यासाठी मागासवर्गीय योजनेतील पैशा खर्च करुन बाबासाहेब हे फक्त मागासवर्गीयांचेच असे दाखवून दिल्याची टिका केली.जेव्हा की सरदार पटेल,छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी विशेष निधी तयार करण्यात आलेला असताना बाबासाहेबांसाठीही विशेष निधी तयार न करणे म्हणजेच सरकार जातीभेद रोवण्याचे काम करीत असल्याची टिका केली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागातर्फे विदर्भ दौèयाचे आयोजन करण्यात आले आहे. या दौक्तयांतर्गत प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. गायकवाड गोंदिया येथे आले होते.जंतर मंतरवर राज्यघटनेची झालेली होळीही ६८ वर्षात पहिलीच घटना होती. या घटनेनंतर जबाबदार मंत्र्यांनी बेजाबाबदारीचे वक्तव्य केले. घटनेबाबत त्यांची भूमिका विचारी असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपा सरकारने नोटबंदी करून देशाला आर्थिक मंदीच्या खाईत लोटले आहे. याचा बदला आगामी निवडणुकात घेतला जाईल. पेटड्ढोल दरवाढीने अनेक प्रश्न निर्माण झाले असून सर्वसामान्य जनता हवालदिल आहे. आता देशातील शेतकरी निवडणुकांची प्रतिक्षा करीत असून त्यात सरकारचा हिशेब चुकता करेल, असे त्यांनी सांगितले.