पार्किंग प्लाजा, कॉलनी व नाट्यगृहासाठी साडेतीन कोटीचा निधी मंजूर

0
10

गोंदिया,दि.२३ : आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने गोंदियात शहर पोलीस स्टेशनच्या मागे बहुमजली पार्किंग प्लाजाच्या निर्मितीसाठी १.५० कोटी, रेलटोली येथे निर्माणाधीन नाट्यगृह तथा गाई गंगाबाई स्त्री रुग्णालय परिसरात कर्मचाèयांच्या निवासी कॉलनीसाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे ही कामे येत्या दोन महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
गोंदिया शहरात वाहनांची वाढती संख्या आणि वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यातच पार्किग सुविधा कमी असल्याने रस्त्यांवर पाहने पार्किंग करून ठेवण्यात येत होती. ही समस्या मार्गी लावण्यासाठी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेस-राकाँ सरकारकडे पाठपुरावा केला होता. तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी बहुमजली पार्किग प्लाजाला मंजुरी देऊन निधी मंजूर केला होता. त्या जागेवर आता पार्किंग प्लाजाचे काम सुरू असून आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नाने पार्किंग प्लाजाच्या निर्मितीसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत दोन कोटी रुपये मंजूर झाले होते. त्या रकमेवर ५० लाख रुपये व्याज नगरपरिषदेला मिळाले आहे. या पार्किंग प्लाजासाठी ७ कोटीचे बजेट असून आठ महिन्यापूर्वीच आमदार अग्रवाल यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना विनंती करून ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करवून घेतला होता. आधीच नगरपरिषदेकडे २ कोटी ५० लाख रुपये आहेत. आता उर्वरित १ कोटी ५० लाख रुपये नगरविकास विभागाने मंजूर केले आहेत. यामुळे येत्या दोन महिन्यात पार्किंग प्लाजाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. .
गोंदियात नाट्यगृह निर्मितीसाठी आमदार अग्रवाल यांनी प्रयत्न करून राज्य शासनाकडून १० कोटी रुपयांची योजना मंजूर करवून घेतली. २०१२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते निर्माणकार्याचा शिलान्यास करण्यात आला होता. वेळोवेळी आमदार अग्रवाल यांनी राज्य शासनाकडून ९ कोटी रुपये नगरपरिषदेला मिळवून दिले. सदर निर्माणकार्य लवकरात लवकर पूर्ण व्हावे, याकरिता उर्वरित १ कोटी रुपये राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून नगर परिषदेला उपलब्ध करून दिले आहेत. विशेष म्हणजे निर्माणाधीन नाट्यगृहात एक हजार नागरिक बसण्याची व्यवस्था असून सोबत दुकानगाळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. .
शासकीय रुग्णालयातील कर्मचाèयांना निवासाची सुविधा देऊन त्यांची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून आमदार अग्रवाल यांनी १०० सदनिकांच्या निवासी कॉलनीचे निर्माणकार्य बाई गंगाबाई रुग्णालय परिसरात केले असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, संबंधित कंत्राटदाराची बिले थकित असल्यामुळे निधीअभावी निर्माण कार्य कासवगतीने सुरू आहे. आमदार गोपालदास अग्रवाल यांनी प्रयत्न करून राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडे निर्माणकार्य पूर्ण करण्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी मागितला. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आरोय विभागाने निधीची तरतूद करून दिली. यामुळे आता परिसरात निर्मित ५ भव्य इमारतींमध्ये शंभर कर्मचाèयांच्या कुटुंबियांकरिता निवासाची व्यवस्था होणार आहे.
गोंदिया शहराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, जि. प. सभापती रमेश अंबुले, लता दोनोडे, पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे, चमनलाल बिसेन, शकील मंसुरी, श्वेता पुरोहित, सुनील तिवारी, सुनील भालेराव, निर्मला मिश्रा, शिलू ठाकूर, क्रांतीकुमार जायस्वाल, दीपिका रूसे, भागवत मेश्राम, पराग अग्रवाल, व्यंकट पाथरू आदींनी आमदार अग्रवाल यांचे अभिनंदन केले आहे..