शेतकऱ्यांचे पैसे तत्काळ जमा करा : रहांगडाले

0
14

तिरोडा,दि.23 : तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या विविध कामांबाबत आढावा बैठक घेतली.यात प्रामुख्याने कोअर झोन व बफर झोनअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये विकासकामांचा आराखडा तयार करणे, अटल विश्वकर्मा योजनेंतर्गत नोंदणी झालेल्या कामगारांना लाभ, तालुकास्तरावर गटविकास अधिकाऱ्यांमार्फत प्रलंबित महात्मा फुले वॉर्ड तिरोडा येथील अतिक्रमणधारकांना पट्टेवाटप करणे, जिल्हा सेतू समितीच्या रिक्त जागा तत्काळ भरणे, तिरोडा तालुक्यातील कुलपा येथील गैरआदिवासी बांधवांना पट्टेवाटप करण्याकरिता संपादित केलेल्या जमिनीचा शेतकऱ्यांना आठ दिवसांच्या आत मोबदला देणे, मावा, तुडतुडा व दुष्काळग्रस्त निधीमध्ये तिरोडा, गोरेगाव व गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांना विनाविलंब पैसे देण्यात यावे, यासह अन्य विषय आढावा सभेत घेण्यात आले. सभेत जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी सर्व प्रकरणे आठ दिवसात निकाली लावण्याचे आदेश संबंधित विभागप्रमुखांना दिले.सभेला तिरोडाच्या नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, मजूर सहकारी संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव उमाकांत हारोडे, निवासी उपजिल्हाधिकारी हरीश धार्मिक, जिल्हा नियोजन अधिकारी मृणाली भूत, मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापक हिना अग्रवाल, उपविभागीय अधिकारी गंगाधर तळपादे, तहसीलदार कल्याणकुमार डहाट, संजय रामटेके, पंचायत समिती सदस्य पुष्पराज जनबंधू, वनपरिक्षेत्राधिकारी शेंडे व संबंधित अधिकारी उपस्थित होते. .