सरकारवरील विश्वासामुळेच कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश : विनोद अग्रवाल

0
10

गोंदिया,दि.९.: : स्वपक्षाचे कोणतेच व्हीजन नसल्याने व पक्षात घुसमट होत असल्याने अनेक विरोधी पक्षातील कार्यकर्ते केंद्र व राज्य शासनाच्या विकासात्मक कामाने प्रभावी होऊन व सरकारवरील विश्वासामुळेच भाजपात मोठ्या संख्येने प्रवेश करीत आहेत. ही भाजपाच्या कार्याची पावतीच आहे, असे प्रतिपादन भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले.

तालुक्यातील तांडाटोली (खमारी) येथे आयोजित शरदपौर्णिमा उत्सवाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हा महामंत्री भाऊराव उके हाते. मंचावर प्रामुख्याने भैय्यालाल मानकर, छबीलाल ठाकरे, ओमप्रकाश गायधने, कनीराम तावाडे, अशोक बागडे, आत्माराम, राजेंद्र पारधी, भीमराव उके, धनराज बिसेन, मदन तावाडे, तालचंद कटरे, चुलोदचे सरपंच बालू बिसेन, वासुदेव उके उपस्थित होते. या प्रसंगी तांडाटोली येथील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार व राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार तसेच गोंदिया विधानसभा क्षेत्रातील भाजपा माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या जनहिताच्या कार्यवर विश्वास ठेवत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांचे विनोद अग्रवाल यांनी दुपट्टे घालून स्वागत केले व जनतेचे काम करण्याचे आवाहन केले. भाजपात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये बबलू तरोणे, मुकेश पाथोडे, योगेश बिसेन, विजय मेंढे, भूवन भांडारकर, हेमराज तेरोणे, प्रशांत भुंबर, शैलेश तावाडे, सारथीक गायधने, राम गायधने, राजू चुटे, मोहनलाल पाथोडे, चंद्रशेखर बावनथडे, चंद्रशेखर मेश्राम, शालीकराम तरोणे, विजय पटले, मुरली गौतम, सतीश फुंडे यांचा समावेश आहे. दरम्यान, या कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन बळकटीसाठी पक्षाचे काम घराघरात पोहोचविण्याचा विश्वास भाजपा पदाधिकाऱ्यांना दिला.