शेतकरी मागणारा नाही तर देणारा आहे – नाना पटोले

0
21

साकोली,दि.09ःःशेतकरी जगाचा पोशिंदा आहे. तो राब राब राबून धान पिकवितो व स्वत:पेक्षा इतरांना खाऊ घालतो. मात्र, निसर्गाची अवकृपा व शासनाच्या दुर्लक्षामुळे त्याला वाईट दिवस आले आहेत. सततची नापिकी, वाढते कर्ज यामुळे शेतकर्‍याला कर्जमाफीची गरज आहे. शेतकरी मागणारा नाही तर देणारा आहे. शेतपिकाला चांगला भाव मिळाला तर शेतकर्‍याला मागायचीही गरज पडणार नाही., असे मत अखिल भारतीय कॉंग्रेसशेतकरी शेतमजूर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.
जनहित सामाजिक सेवाभावी संस्था भंडाराच्या वतीने कुंभली येथे आयोजित र्शावणबाळ सेवा राज्य नवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ नवृत्ती वेतन योजना, संजय गाधी अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना ब्लँकेट वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी आ. आनंदराव वंजारी तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, जि. प. सदस्य होमराज कापगते, जि.प. सदस्य आकाश कोरे, माजी सभापती मदन रामटेके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्षहेमकृष्ण वाडीभस्मे, देवरीचे प्राचार्य अरूण झिंगरे, दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, उमेद गोडसे, तालुका अध्यक्ष अंगराज समरीत, सरपंच कमल भेंडारकर, भरत खंडाईत, अंताराम खोटेले, ज्योत्सना घोरमारे, जया भुरे, नरेंद्र बुरडे, लता दुरूगकर, पं. स. सदस्य लखन बर्वे, नगरसेवक अनिल निर्वाण, विनोद भुते, सत्यवान हुकरे, प्रदिप मासुरकर उपस्थित होते.
प्रास्ताविक के. वाय. नान्हे यांनी केले. यावेळी त्यांनी जनहित सामाजिक सेवाभावी संस्थेतर्फे दोन वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच स्व. डॉ. बाबुराव फुंडे यांच्या जिवनावर प्रकाश टाकला. त्यांच्या जयंतीप्रित्यर्थ ब्लॅंकेट वाटप कार्यक्र म आयोजित केल्याचे सांगितले. यावेळी २१0 लाभार्थ्यांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. संचालन व आभार राकाँचे जिल्हा महासचिव प्रभाकर सपाटे यांनी केले. कार्यक्रमासाठी रवी राऊत, सुरेश बघेल, अनिल टेंभरे, निकेश घरडे, यशपाल कर्‍हाडे, प्रविण भांडारकर व गावकर्‍यांनी सहकार्यकेले.