छत्तीगड व मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक मद्य विक्रीची दुकाने बंद

0
7

गोंदिया दि.९.: छत्तीसगड व मध्यप्रदेश विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया घोषित करण्यात आलेली असून राज्य सीमा जवळील जिल्हा राजनांदगाव (छ.ग.) अंतर्गत विधानसभा मतदार संघाची मतदान प्रक्रिया १२ नोव्हेंबर २०१८ रोजी होणार असून राज्य सीमा लगतच्या तालुका देवरी व सालेकसा तसेच बालाघाट (म.प्र.) अंतर्गत विधानसभा मतदार संघाची मतदान प्रक्रिया २८ नोव्हेंबर २०१८ रोजी होणार असून राज्य सीमा लगतच्या तालुका तिरोडा, गोंदिया, आमगाव व सालेकसा अंतर्गत येणाऱ्या गावातील परवानाधारक देशी/विदेशी व बिअर बार दुकाने दोन दिवसापूर्वीपासून बंद ठेवण्यासंबंधीत तसेच ११ डिसेंबर २०१८ रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आदेश लागू करण्यात आले आहे.
सदर निवडणूका खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी महाराष्ट्र विदेशी मद्य नियमावली १९६९ चे नियम ९ए (२)(डी) व महाराष्ट्र देशी दारु नियमावली १९७३ चे नियम २६(२)(डी) नुसार जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलवकडे यांनी गोंदिया जिल्ह्यातील छत्तीसगड व मध्यप्रदेश या राज्याच्या सीमेपासून महाराष्ट्र राज्यातील ५ कि.मी.च्या परिसरातील सर्व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहे.
राज्य बंद कालावधी
छत्तीसगड १० नोव्हेंबर २०१८ रोजी १७.३० पासून ते १२ नोव्हेंबर २०१८ रोजी संपूर्ण दिवस
मध्यप्रदेश २६ नोव्हेंबर २०१८ रोजी १७.३० पासून ते २८ नोव्हेंबर २०१८ रोजी संपूर्ण दिवस
छत्तीगड व मध्यप्रदेश या दोन्ही राज्यातील ११ डिसेंबर २०१८ रोजी मतमोजणीच्या दिवशी (मतमोजणी संपेपर्यंत)
या आदेशाचे उल्लंघन करुन मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी गोंदिया यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.