विधानसभेच्या निवडणूका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरने घ्यावे

0
13

गोंदिया,दि.03ः– ऑक्टोबर महिन्यात होणाèया विधानसभेच्या निवडणूका ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरने करण्यात यावे या मागणीचे निवेदन शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १ जुलै रोजी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांना दिले. महाराष्ट्रात आगामी ऑक्टोबर महिन्यात होणाèया विधानसभेच्या निवडणूका वर्तमान ईव्हीएम मशीन अर्थात एनर्जी व्होटीग मशीन फार मोदी ने न करता सरळ बॅलेट पेपरने निर्वाचन आयोगाने करावे. सध्या पार पडलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिकनिवडणूकामुळे जनतेचा विश्वास पूर्णतः ईव्हीएम मशीन वरून उठला असून सर्वसामान्य मतदार म्हणत आहे की, त्यांनी भाजपला मतदान केलेच नाही तरीही ईव्हीएम मशीनमुळे त्याची मते भाजपला गेली आणि भाजपने ईव्हीएम मशीन जी आता एनर्जी व्होटींग मशीन फार मोदी बनली असून तिचा उपयोग प्रचंड बहुमताने देशाची सत्ता मिळविण्यात केले आहे

याकरिता आता ईव्हीएम मशीनने पार पडणाèया निवडणूक प्रक्रियेला निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया म्हणता येवू शकत नाही या आशयाचे निवेदन शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुख्य निर्वाचन आयु्नत भारत सरकार दिल्ली तथा मुख्य निर्वाचन अधिकारी मुंबईच्या नावाने जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांना देवून आगामी विधानसभा निवडणूका तसेच अन्य निवडणूका ईव्हीएम मशीनने न करता बॅलेट पेपरने करण्याची मागणी केली आहे. सदर निवेदन शहर राकापा अध्यक्ष अशोक सहारे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी प्रतिनिधी मंडळात राकापा पदाधिकारी तसेच देवेंद्रनाथ चौबे, मनोहर वालदे, बालकृष्ण पटले, राजु एन जैन, विनित सहारे, हेमंत पंधरे, शैलेंद्र वासनिक, आशा पाटील, हर्जित जुनेजा, निशिकांत बंसोड, संजीव राय, कान्हा यादव, चंद्रकुमार चुटे,एकनाथ रहीले, कृष्णा भांडारकर, विनोद पाटील, रौनक ठाकूर आदी उपस्थित होते.