गोंदियाच्या नेत्यांनी मतदारसंघाचा नव्हे स्वतःचा विकास केला-खा.नवनित राणा

0
24

गोंदिया ,दि.२०:- : पुर्व विदर्भातील गोंदिया हे महत्वाचे शहर असले तरी गेल्या ७० वर्षापासून या शहराच्या विकासाकडे नजर फिरवल्यास येथील नेत्यांनी मतदारसंघासह शहराच्या विकासाएैवजी आपल्याच विकासावर भर दिल्याने उद्योग व इतरसोयींपासून गोंदिया वंचित राहिल्याची टिका युवा स्वाभीमान पक्षाच्या अमरावतीच्या खासदार नवनीत रवि राणा(कौर)यांनी केली.त्या गोंदिया येथील पोवार बोर्डींग येथे आयोजित गोंदिया जिल्हा युवा स्वाभीमान पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होत्या.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष जितेश राणे होते, मंचावर शेखर बिसेन, मोतीलाल चौधरी, अमरावतीचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. त्यापुर्वी त्यांचे येथील फुलचूर नाका चौकात स्वागत करीत ढोलताश्यात मोटारसायकल रॅलीने कार्यक्रमस्थळी आणण्यात आले.
खा.नवनित राणा पुढे म्हणाल्या की आम्ही ज्या अमरावती जिल्ह्यात राजकारण करतो त्या जिल्ह्यात रवी राणा यांच्या जातीचे मतदारच नाहीत.अशाठिकाणी जाऊन आम्ही सामाजिक कार्यातून आणि जातीपातीला बाजूला सारून युवा स्वाभीमान पक्षाला qजवत केले आहे.पक्ष असो की संघटन वाढविण्यासाठी परिवारासारख्या कार्यकत्र्यांची गरज आहे.
येत्या विधानसभेच्या निवडणुकीत पुर्व विदर्भातील बहुतांश विधानसभेच्या जागा लढविण्याचा निर्णय युवा स्वाभीमानचे प्रमुख आमदार रवी राणा यांनी घेतला असून गोंदिया विधानसभा मतदारसंघ हे आपल्या नियोजनात अव्वलस्थानी आहे.त्यामुळे या मतदारसंघातील कार्यकत्र्यांनी कुठल्याही मातब्बर नेत्याच्या मटन दारुला बळी न पडता स्थानिक पातळीवरील समस्यांना घेऊन काम सुरु करा.स्थानिक मतदाराला आपले काम व कार्य चांगले दिसले तर ते नक्कीच आपला निर्णय मतपेटीत मताधिकारातून बजावतील.गोंदियाचे नाव मोठे असले तरी विकासासाठी करण्यायोग्य खुप काही असल्याने आपण याठिकाणी जोमाने काम करा असे म्हणाल्या. सोबतच चक्रवर्ती राजाभोज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, शिवाजी महाराज, राणी अवंतीबाई, फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या प्रेरणने या जिल्ह्यात विचारांची मोठी नाळ बघावयास मिळत असल्याने त्या महापुरुषांचे विचार व त्यांचे कार्यही समाजापर्यतं पोचविण्याचे आवाहन केले. बडनेरासारख्या शहरात २८ वर्षाचा युवक स्वतःचे राजकीय अस्तित्व नसताना आणि कुणी राजकीय गॉडफादर नसतांना निवडून येऊ शकतो तर येथील तर आपण जन्माने रहिवासी असल्याने येथूनही निवडून येण्याची क्षमता आपल्यात असायला हवी, त्यासाठी फक्त विश्वास निर्माण करा असे खा.राणा म्हणाल्या.आम्ही अमरावती जिल्हयात सण तौह्यारांच्यावेळी ७० हजार कुुटुंबाना किराणा वाटप करतो, ते निवडणुकीसाठी नव्हे तर दरवर्षी जेव्हा की निवडणुका फक्त ५ वर्षांनी येतात. आम्ही किराणा देऊन त्या कुटुबांची दिवाळी, ईद असो की इतर सण उत्साहात साजरा व्हावा हा उद्देश मनात ठेवतो, दारु व मटन देऊन कुटुंब उध्वस्त करीत नाही असे सांगत ६०० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी युवा स्वाभीमानच्यावतीने घेण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या. त्याच धर्तीवर गोंदियातही काम सुरु करा आणि येत्या विधानसभेच्या निवडणुकीत युवा स्वाभीमान पक्षाचा झेंडा याठिकाणी फडकवा असे आवाहन केले.
यावेळी बोलतांना जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांनी गोंदियात मोठ्या राजकीय पक्षांची ताकद असून त्यांच्यासमोर आपल्या पक्षाला उभे करीत असताना मोठी आव्हाने समोर होती, तरीही गोंदिया विधानसभा मतदारसंघाला लक्ष्यस्थानी ठेवत गावागावात युवा स्वाभीमान पक्ष पोचवून ८५ गावात जनजागरणाचे कार्यक्रम हाती घेतल्याची माहिती दिली.
आपण सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलो असून आपल्या मागे ही कुठला राजकीय पाठबळ नसतांही रवीभाऊच्या आदर्शावर काम सुरु आहे. तसेच मतदारसंघातील शेतकरी, युवा, प्रकल्पलग्रस्त, दिव्यांग, कर्मचारी असो की ओबीसींच्या प्रश्नावर सातत्याने लढा देण्यात आल्याचे सांगत गोंदियाचा विकास जो व्हायला हवा होता तो न झाल्याने त्या विकासासाठी रवीभाऊ राणा व नवनित राणासारख्या लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाची व पाqठब्याची गरज असल्याचे म्हणाले.यावेळी मोतीलाल चौधरी यांनीही विचार व्यक्त केले.संचालन शिव नागपूरे व जिवन शरणागत यानी केले.