सिताराम येचुरी यांची माकपच्या महासचिवपदी निवड

0
8

विशाखापट्टणम- येथे सुरू असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अखिल भारतीय अधिवेशनाची रविवारी सांगता होणार असून, पक्षाच्या नव्या महासचिवपदी ६२ वर्षीय खासदार सिताराम येचुरी यांची निवड करण्यात आली. निवडणुकीच्या राजकारणामध्ये माकपची होत असलेली पिछेहाट आणि पक्षापासून दुरावलेला तरूणवर्गाला आपलेसे करण्यासाठी महासचिवपदी तुलनेने तरूण असलेल्या येचुरी यांच्याच नावालाच जास्त पसंती होती. केरळचे माकप नेते एस. रामचंद्रन पिल्लाई आणि सिताराम येचुरी या दोघांच्या नावाची सचिवपदासाठी चर्चा सुरू होती. मात्र, पिल्लाई यांनी त्यांचे नाव मागे घेतल्यामुळे येचुरी यांची माकपच्या सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली.