युती तुटली नसती तर भाजपाची ताकद कळली नसती – देवेंद्र फडणवीस

0
9

कोल्हापूर, दि. २३ -मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबतची युती तुटली नसली तर भाजपला स्वत:ची ताकद कळली नसती, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. फडणवीस यांनी भाजपच्या अधिवेशनात कार्यकर्त्यांना संबोधित केले.शिवसेनेसोबत युती तुटल्यामुळेच भाजपला स्वबळावर 100 हून अधिक जागा मिळाल्याचे डणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राज्यात एक कोटी सदस्य आहेत. एवढेच नव्हे तर भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. भाजपची सदस्यसंख्या 10 कोटी आहे आणि याचा आपल्याला अभिमान आहे, असेही गौवरोद्‍गार फडणवीसांनी काढले.
तसेच या निवडणुकीतील यशात अमित शहा यांचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी सांगितलं. निवडणुकीपूर्वी ते एक महिनाभर मुंबईत तळ ठोकून होते आणि त्यांनी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.

अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
गेल्या ६० वर्षांत ज्यांनी जनहितार्थ एकही काम केले नाही, ते आमच्याकडे एका वर्षाचा हिशोब मागत आहेत, असा टोला हाणत काँग्रेसने गेल्या ६० वर्षांत काय काय केले हे सांगावे, असा सवाल भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी अधिवेशनादरम्यान केला.
भ्रष्ट्राचारमुक्त शासनाचे वचन दिले होते. आता २६ मे रोजी केंद्र सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे, मात्र एकही घोटाळा बाहेर आलेला नाही, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे भाजपने कार्यकारिणीचे अधिवेशन आयोजित केले आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा झेप घेण्याचा प्रयत्न असल्याचे अमित शहा यांनी यावेळी स्पष्ट केले. यूपीए बारा लाख कोटी रुपयांचे घोटाळे केले. भाजपने सत्तेत आल्यावर पहिल्या दीड महिन्यात संसदेत ठराव मंजूर करून विशेष तपास पथकाकडे माहिती दिली. त्यावर तपास चालू आहे. आम्ही त्यावर कायदा करून काळ दहा वर्षांची शिक्षा निश्चित करण्यात आली आहे, असे शहा यांनी सांगितले.