गोंदिया जि.प.प.स.कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी खोटेले,उपाध्यक्ष मडावी

0
12

गोंदिया,दि.23-गोंदिया जिल्हा परिषद,पचांयत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या सभेत पतसंस्थेच्या अध्यक्षपदी आमगाव पंचायत समिती स्तरावरुन निवडून आलेले एकता पॅनलचे संचालक डी.एम.खोटेले यांची निवड करण्यात आली.तर उपाध्यक्षपदी परिवर्तन पॅनलच्यावतीने निवडून आलेले जिल्हा विजय मडावी यांची निवड करण्यात आली.सचिव पदावर संजय बनकर हे निवडणुकीत निवडून आले होते.अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत समर्थ,परिवर्तन व अभिनव पॅनल एकत्रित आल्या होत्या परंतु परिवर्तनचे संचालक विजय मडावी यांनी एैनवेळेवर पारडे बदलत एकता पॅनलचे हात पकडून उपाध्यक्ष पद मिळवून घेतल्याने परिवर्तन पॅनलच्यावतीने त्यांचा निषेध नोंदविण्यात आला.