भाजपचे युवा प.स.सदस्य तरोणे राष्ट्रवादीत

0
12

गोंदिया,दि.13- जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना जस जसा रंग चढू लागला तस तसे राजकीय क्षेत्रातील नेत्यामधील मतभेद सुध्दा उघड होऊ लागले आहेत.अर्जुनी मोरगाव भारतीय जनता पक्षाचे कर्मठ कार्यकर्ते व पंचायत समिती सदस्य किशोर तरोणे यांनी भाजपमधील नेतृत्वाच्या हुकुमशाही पद्दतीला झुगारत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.तरोणे यांनी नवेगावबांध जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मागितली होती.विशेष म्हणजे तरुण पंचायत समिती सदस्य असलेले तरोणे पाणी समस्या असो की कुठलीही समस्या त्यासाठी पुढाकार घेऊन प्रशासनापर्यंत ते पोचविण्याचे काम करीत होते.त्यांची नवेगावबांध परिसरात चांगली ओळख असून त्यांच्या चांगल्या संबधामूळेच त्यांना जिल्हा परिषदेची निवडणुक लढविण्याचा अाग्रह कार्य्रकत्यार्नी केला होता.त्यानुसार भाजपकडे उमेदवारी मागितली.परंतु तरोणे यांना विद्यमान पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात प्रचार केल्याचा ठपका ठेवत तुम्हाला त्या भागात कुणीही ओळखत नाही,मग तुम्हाला कशी उमेदवारी मिळणार असे सांगत नकार देण्यात आला.भाजपमध्ये सध्या मोठ्याप्रमाणात असतोंष असून जिल्हातील पदाधिकारी यांची जी हूजूरी करणारेनाच उमेदवारी मिळते की काय असे चिन्ह बघून तरोणे यांनी विकासासाठी झटणारे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल,आमदार राजेंद्र जैन व जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर यांच्या नेतृत्तावर विश्वास ठेवत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात प्रवेश केला.त्यांचे स्वागत जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे,जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर,बँकेचे संचालक राजू एन जैन,उध्दव मेहंदळे यांनी केले.