राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा खेळाडूंची नावे जाहिर

0
152

गोंदिया,दि.५ : जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेतून राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेकरीता खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. स्पर्धेमध्ये १४ वर्षाआतील मुलींचा विजयी संघ मिलेनियम नॅशनल स्कुल, पूणे तर विठामाता विद्यालय, कराड जिल्हा सातारा हा संघ उपविजयी ठरला. तृतीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, टाका तालुका अंबड, जिल्हा जालना यांनी पटकाविला. १७ वर्षाआतील मुलींचा विजयी संघ सेंकडरी स्कुल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज, भिलवडी जिल्हा सांगली तर उपविजयी संघ विद्याप्रतिष्ठान मराठी शाळा, बारामती जिल्हा पूणे व तृतीय क्रमांक श्री निकेतन माध्यमिक विद्यालय, नागपूर यांनी प्राप्त केला. १९ वर्षाआतील मुलींचा संघ सेंकडरी स्कुल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज, भिलवडी जिल्हा सांगली तर उपविजयी संघ नगर परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कळमेश्वर जिल्हा नागपूर ठरला असून तृतीय क्रमांक सी डी जैन कॉमर्स कॉलेज, श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यांनी प्राप्त केला. यावेळी प्र. जिल्हाधिकारी मंगेश मोहिते यांच्या हस्ते प्राविण्यप्राप्त संघाला ट्राफी व पदक प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुराम, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, क्रीडा कार्यालयाचे साहेबराव ठाकरे, अजीत पाटील, एस.ए.वहाब, अनिल निमगडे, नाजूक ऊईके, अरुणा गंधे, डी.एस. भारसाकळे उपस्थित होते