सी.जे. पटेल महाविद्यालयात फूटबॉल स्पर्धेची सांगता

0
9

तिरोडा : सी.जे. पटेल महाविद्यालयात फूटबॉल स्पर्धेची सांगता व पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडले. अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त खेळाडू व प्राचार्य डॉ. मृत्युंजयसिंह होते. अतिथी म्हणून माजी आ. दिलीप बन्सोड, डॉ. आलोक द्विवेदी, मुकेश अग्रवाल, लक्ष्मीनारायण दुबे, पंकज देहलीवाल, कोच खुर्शद अंसारी, मुस्तफा सरोवर आदी उपस्थित होते. दोन दिवशीय टुर्नामेंटमध्ये गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील २0 चमू सहभागी झाल्या होत्या. अंतिम सामना 7 ए साईड फूटबॉल क्लब तिरोडा व गोंदिया अँकादमी फूटबॉल क्लब यांच्यात झाला. यात गोंदियाची चमू विजेता ठरली. बक्षीस वितरण कार्यक्रमात अतिथींनी मार्गदर्शन केले. प्रास्तावित डॉ. प्रविण कुमार व संचालन डॉ. संजय जगणे यांनी केले. आभार प्रा. विजय माने यांनी मानले. कार्यक्रमासाठी एजाज सय्यद, सुधीर तांडेकर, हर्षद सिंगनजुडे, अनिल कोकुडे, शुभम पटले, शुभम सिंगनजुडे, कौशिक सिंगनजुडे, संदीप नेवारे, रवी नेताम, उमेश बोबडे आदींनी सहकार्य केले.