शिक्षक संघाचे दोन तुकडे

0
26

गोंदिया- गेल्या दोन दशकापासून एकहाती सत्ता मिळविणाèया महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या शाखेमध्ये एकवाक्यता न आल्याने यावेळच्या निवडणुकीत दोन्ही एकमेकाविरुद्ध उभे ठाकले आहेत.याचा लाभ शिक्षक समितीसह इतर संघटनेला मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.विशेष म्हणजे गेल्या १० वर्षात गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या संचालकाला अध्यक्ष पद व सचिव पद सुद्धा मिळाले तरीही गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या काहींच्या पोटात का दुखले कुणास ठाऊक अशी चर्चा सुरू झाली आहे.
गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ व भंडारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघात समन्वय व्हावा यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत पाठपुरावा सुरू होता.विशेष म्हणजे राज्य कार्यकारिणीने सुद्धा जिल्हापातळीवरच निर्णय घ्यावा अशा सूचना दिल्याचे संघाच्या पदाधिकाèयांचे म्हणणे होते.परंतु या दोन्ही जिल्हा कार्यकारिणीत समन्वय झाले नाही.परंतु गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष तसेच शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष डी.टी..कावळे,आनंद पुंजे व विद्यमान सचांलक एस.यु.वंजारी यांनी गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या भूमिकेला पाठिंबा देण्याएैवजी भंडारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या भूमिकेला पाqठबा दिल्याने शिक्षक संघातही आता पद व प्रतिष्ठेसाठी लढाई सुरू झाल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे या निवडणुकीत शिक्षक संघाला यश मिळते की कुणाला याकडे लक्ष लागले असले तरी गोंदिया किंवा भंडारापैकी एका जिल्ह्यातील शिक्षक संघाला मात्र चांगलाच फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
त्यातच भंडारा जिल्हा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सैय्यद यांनीही या प्रकरणात उडी घेत गोंदिया जिल्हा शिक्षक संघाच्या अध्यक्षावर आरोप करीत ग्राहक पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष नुतन बांगरे यांच्या कार्यप्रणालीवरच शंका उपस्थित केली आहे. विद्यमान अध्यक्षाने आपल्या कार्यकाळात शिक्षक संघाला विश्वासात घेऊन एखादा काम केल्याचा पुरावा दाखविण्याचे आव्हान करीत पतसंस्थेच्या सभासदांच्या नातेवाईकांना नोकरीवर न घेता इतरांनाच नोकरीवर घेतल्याचा आरोप करीत अखिल भारतीय संघाच्या संचालकाचा भाऊ, साळी, पुतण्या आणि मुलांना नोकरीवर घेणारे प्राथमिक शिक्षक संघाचे प्रामाणिक कसे राहू शकतात. असा मुद्दा उपस्थित करुन य निवडणुकीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघच एकमेकाविरुद्ध गोंदिया-भंडारा जिल्ह्यात उभे असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एकीकडे गोंदिया शिक्षक संघ सहकार पॅनलच्या माध्यमातून तर भंडारा शिक्षक संघ परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून रिंगणात उतरले आहे.
या निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गोंदिया पुरस्कृत एकता पॅनेलने अधिकृत उमेदवार म्हणून गोंदिया तालुकास्तरीय गट (१) मधून -बांगरे नूतन भाउराव व तिरोडा गटातून-गुन्नेवार राजू विठोबा ,गोरेगाव,सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव पंचायत समिती गटातून- डोये विजयकुमार नामदेव ,आमगाव,देवरी व सालेकसा गटातून -बडवाईक नरेश रतन .जिल्हास्तरीय गट उमेदवारांमध्ये -गोटेफोडे केदारनाथ रामदास (सर्वसाधारण गट ),चुटे गणेश नारायण (इ.मा.व.),बोरकर दिनेश पुरुषोत्तम (अनु .जाती/जमाती ),शहारे मोहन रामलाल (वि.भ.जा./वि.मा.प्र.),महिला राखीव गटातून -ठाकरे रेखा माणिकचंद व पारधी शीला धर्मराज निवडणूक रिंगणात अनु यांना ढाल तलवार हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.
तर या निवडणुकीत सहकार पॅनेलच्या माध्यमातून शिक्षक समिती रिंगणात उतरली असून समितीच्यावतीने तुमसर गटातून अशोक सहसराम ठाकरे,सर्वसाधारण गटातून मधुकर गोमाजी लेंढे,अनु.जाती व जमाती गटातून अविनाश चंद्रभान शहारे,महिला राखीव गटातून दीक्षा महादेव फुलझेले,अरुणा चंपतराव विरुठकर,ओबीसी गटातून मूलचंद पतीराम वाघाये,विमभज गटातून विनोद रामजी राठोड तर आमगाव,देवरी व सालेकसा गटातून सुरेश गजनान कश्यप,सडक अर्जुनी,मोरगाव अर्जुनी व गोरेगाव गटातून डी.पी.आकरे,तिरोडा गटातून पी.आर.पारधी तर गोंदिया पंचायत समिती गटातून शिक्षक समितीने भारती तिडके, भंडारा गटातून झाशीराम पटोले, मोहाटी गटातून किशोर ईश्वरकर, गोंदिया जि.प.गटातून शैलेष बैस, लाखनी गटातून विलास टिचकुले, जि.प.भंडारा गटातून दिनेश खोब्रागडे, यांना समर्थन दिले आहे.सहकार पॅनेल या निवडणुकीत छत्री चिन्हावर रिंगणात आहे. तर प्रगती पॅनल पतंग चिन्हावर निवडणूक लढवित आहे.