मनोहर आयसीसीच्या चेअरमनपदी बिनविरोध

0
13
नवी दिल्ली, दि. १२ – नुकताच बीसीसीआयच्या (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या शशांक मनोहरयांची आयसीसीच्या (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे.
आयसीसीचे चेअरमनपद भूषविण्यासाठी आपण बीसीसीआयअध्यक्षपदाचा राजीनामा दिला, या वृत्ताचे शशांक मनोहर यांनी नुकतेच खंडन केले होते. मंगळवारी मनोहर यांनी बीसीसीआय अध्यक्षपद सोडताच आयसीसी चेअरमन बनण्यासाठीच मनोहर यांनी अध्यक्षपद सोडल्याचे बोलले जात होते. अखेर हे वृत्त खरे ठरले असून दोन वर्षांच्या कालावधीसाठी त्यांची निवड झाली आहे.
मनोहर यांनी ऑक्टोबर २०१५ मध्ये जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून हा त्यांचा दुसरा कार्यकाळ होता. या महिन्यात आयसीसीला आपल्या नव्या चेअरमनची निवड करायची असताना मनोहर यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आयसीसीने गेल्या फेब्रुवारी महिन्यात जाहीर केले होते, की चेअरमन स्वतंत्र राहणार असून तो आपल्या देशाच्या बोर्डात कुठल्याही पदावर राहणार नाही.