प्रतिभावान खेळाडूंना संधीची गरज

0
12

सालेकसा,दि.०७: ग्रामीण क्षेत्र ही प्रतिभावंत खळाडूंची खाण आहे. परंतु तेथील खेळाडूंना संधी आणि मार्गदर्शन उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या प्रतिमा दडपल्या जात आहेत. प्रतिभावंत खेळाडू आणि विशेषत: महिलांनाा खेळाची संधी उपलब्ध करुन मागील ७ वर्षापासून खेळाडू घडविण्याचा भजेपाच चषक आयोजकांचे कार्य प्रशंसनीय आहे. असे उद्गार हरियाना स्टीलर्स प्रो.कबड्डी संघाचे खेळाडू परमोद नरवारल यांनी व्यक्त केले.
भजेपार येथील सुर्योदय क्रीडा मंडळ, नवयुवक कबड्डी क्लब, संवेदना बहुउद्देशिय संस्था व समस्त ग्रामवासीयांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भजेपार चषक महिला पुरुष कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दरम्यान उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. काँग्रेसचे जिल्हा महासचिव सहषराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार संजय पुराम यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. विशेष म्हणजे उद्घाटनाच्या सामन्यात ५०-५५ वर्षावरील जेषठ खेळाडूंनी कबड्डी खेळून उपस्थितांना चकित केले. ६० ते ६५ वर्षाच्या दोन आजीबार्इंनी देखील तरुण मुलींसोबत कबड्डी खेडून सर्वांना चकीत केले. यावेळी मंचावर सरपंच सखाराम राऊत, उपसरपंच कैलास बहेकार, उद्योजक राजू काळे, देवराम चुटे, तंमुस अध्यक्ष कृष्णकुमार चुटे, खुशाल शिवणकर, इसराम बहेकार, रामलाल दोनोडे, अनंतराम कोरे सहित ईतर मान्यवर उपस्थित होते. नवनिर्वाचि ग्रामपंचायत पदाधिकारी आणि गावातील प्रतिभावंत खेळाडूंचा यावेळई सत्कार करण्यात आला. तीन दिवसीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील ७० पेक्षाही अधिक संघ या स्पर्धे! सहभागी झाले असून ८ जानेवारीला रात्री ९ वाजता प्रो.कबड्डी प्लेयर प्रितम छिल्लर आाणि शशांक वानखेडे यांच्या विशेष उपस्थितत बक्षीस वितरण होणार आहे. कार्यक्रमाची प्रस्तावना मंडळाचे अध्यक्ष चंद्रकुमार बहेकार यांनी मांडली, संचालन रमसूला चुटे आणि आभार चंद्रकुमार पाथोडे यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी गावकर अथक परिश्रम घेत आहेत.

पर्यावरण संरक्षण व जलसंवर्धनाचा संदेश
पाहुण्यांच्या स्वागताला पुषेगुच्छ, पुष्पहार न देता एक वृक्षांची रोपटे भेट म्हणून देण्यात आले. जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर टेक विसडम केंद्राच्या विद्याथ्र्यांनी सादर केलेला जागृती पर समुह नृत्य प्रेक्षकांच्या मनात कायमचा घर करुन गेला. प्रत्येक कार्यातून आयोजकांनी जनजागृती करण्याचा यशस्वी प्रयत्न केला हे विशेष.