तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत आर.बी.पी.माध्य.शाळा व ज्यु.कॉलेजचे वर्चस्व

0
12

संख(राजेभक्षर जमादार),दि.21ः सांगली जिल्ह्यातील जत तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संख येथील राजाराम बापू पाटील माध्यमिक शाळा व ज्युनिअर कॉलेजच्या परिसरात नुकतीच पार पडली.या तालुकास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेच्या सर्वच गटात राजाराम बापू पाटील माध्यमिक शाळा व ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी विजय प्राप्त करीत वर्चस्व स्थापित केले.या स्पर्धेचे उद्घाटन पी.एस.बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील विविध शाळा व कॉलेज मोठ्या प्रमाणात सहभाग घेतले होते. या स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील व १७ , १९ वर्ष खाली या सर्व वयोगटातील मुले व मुली या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या एकूण 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतले होते.

यामध्ये १४ वर्षे वयोगटातील मुलीमध्ये प्रथम क्रमांक सृष्टी गुराप्पा हिप्परगी , १९ वर्ष वयोगट मुलांमध्ये शेखर सिदगोंडा बिरादार, १९ वर्षे वयोगट मुली मध्ये तेजस्विनी श्रीशैल बिरादार यांनी प्रथम क्रमांक पटकावला . तसेच या स्पर्धेत आर.बी.पी. हायस्कूल संख या शाळेच्या १४ विद्यार्थीची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.या सर्व खेळाडू यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बसवराज पाटील व संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष पाटील मुख्याध्यापक एल. एल. जिगजेणी सर, तसेच शालेय क्रीडा शिक्षक ए.एस. बिराजदार व हिप्परगे सर , या सर्व जणांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा अती उत्तम पार पाडण्यात आले.तसेच संख येथील आर.बी.पी.हायस्कूल व ज्यु.कॉलेज संख यांचे नाव लौकिक गावातील ग्रामस्थ व पालकवर्ग कौतुक होत आहे.