सालेकसात वैद्यकीय व दंत शिबीर उत्साहात

0
10

सालेकसा,दि. १२ : मौखिक आरोग्यबाबत आबालवृध्दांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी याकरीता राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे वैद्यकीय व दंतशिबीराचे नुकतेच आयोजन करण्यात आले. सालेकसा येथील आयोजित शिबीराचे उद्घाटन आमदार संजय पुराम यांनी केले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. परियाल, जि.प.चे समाजकल्याण सभापती देवराज वडगाये, बाळा अंजनकर, सोहन क्षीरसागर, बबलु कटरे, पोलिस निरीक्षक खांदारे, डॉ. सुषमा नितनवरे, डॉ. राहूल भोयर, मनोज इळपाते, आर.एच.बडोले, अजय डोये, सरपंच योगेश राऊत, ठाकरे व सुदेश जनबंधू यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. संजय पुराम यांनी उद्घाटन प्रसंगी नागरिकांना आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन करुन त्यांनी रुग्णवाहिका, १०८, बेड, एक्सरे मशीन, आरोग्य तपासणी विषयक आवश्यक साधने व अत्याधुनिक आरोग्य सुविधा सालेकसा येथे उपलब्ध करुन देण्यात येईल. असे सांगितले.
प्रास्ताविकातून डॉ. रवि धकाते यांनी शिबीराच्या आयोजनाबाबत व शिबीरात करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रीया तपासणीबाबत माहिती दिली. शिबीरात तज्ञ मार्गदर्शक बालरोगतज्ञ डॉ. रेखा दुबे, डॉ. अस्थिरोग तज्ञ डॉ. राहूल भोयर, स्त्री रोग तज्ञ डॉ. सुषमा नितनवरे, दंतशल्य चिकीत्सक डॉ. नागेश शेवारे, मेडीसीन तज्ञ डॉ. सचिन धगडी, शस्त्रक्रीया तज्ञ डॉ. विमलेश अग्रवाल, डॉ. प्रशात तुरकर व भूलतज्ञ डॉ. सिंग यांनी यावेळी शिबीरात येणाऱ्या रुग्णांची आरोग्यविषयक व दंत तपासणी केली.
कार्यक्रमाचे संचालन सालेकसा ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक नितीन फुलझेले यांनी केले. तर उपस्थितांचे आभार राहूल भोयर यांनी मानले. यावेळी डॉ. मनीष दमाहे, डॉ. मानकर, व्ही.टी.वाणी, नरेंद्र नागपूरे, पोर्णिमा मेश्राम, ममता वाढई, दिपाली बाभरे, उपवंशी, भैसारे, प्रशांत बनकर, नारायण गाईल, सागर राठोड,नितेश वाघाडे, गोविंदा मरस्कोल्हे, परकोरवार, चेतना नर्सिग महाविद्यालयाचे विद्यार्थी, मदर टेरेसा नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्रबुध्द विनायक कल्याणकारी संस्था व दृष्टी बहूउद्देशिय संस्थेचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.