कोसमतोंडीच्या स्वस्तधान्य दुकानदारावर कारवाई कधी होणार

0
20
सडक/अर्जुनी ,दि.5-तालुक्यातील कोसमतोंडी येथील स्वस्त धान्य दुकानदार श्री शिवचरण फागूजी कापगते यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सिध्द होवूनही जिल्हा पुरवठा विभागाकडून कारवाईस माञ जाणिवपुर्वक उशीर केला जात असल्याची चर्चा नागरिक करु लागले आहेत.स्वस्त धान्य दुकानदाराने शिधा पञिका नोंद वही व शिधा वाटप रजिष्ट्रर वर व्हाईटनर लावून पुरावे नष्ट करण्याचा प्रर्यत्न केलेला आहे.या बोगस शिधा पञिकेचा लाभ स्वस्त धान्य दुकान दाराला होत आहे. अविवाहीत मुलांना कुटूंब प्रमुख दाखवून त्यांचे लग्न न होता त्यांच्या पत्नीचे व मुलांचे नावे दाखवून त्यांच्या नावाने विक्री केली आहे.शासकीय नौकरदारांना अंतोदय व प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी दाखवून त्यांच्या नावे विक्री करून स्वतःच धान्याची उचल केली आहे. स्वस्त धान्य दुकान दाराने वडीलाचे ,मुलांचे ,नातवांची व बहीनीचे नाव बिपीएल मध्ये दाखवून त्याचा लाभ राशन दुकानदार घेत आहे.अस्तिवात नसलेल्या लोकांच्या नावे विक्री दाखवून प्रत्यक्ष लाभ स्वस्त धान्य दुकानदाराला होत आहे.स्वस्त धान्य दुकानाच्या रेकार्डची दिनांक 4 जुन 2015 चे तक्रार अर्जाच्या अनुषंगाने दिनांक 18 आगस्ट्र 2015 तालुका पुरवठा निरीक्षक सी.जी.चादेकर यांनी पंचा समक्ष केलेल्या चौकशी दरम्यान निदर्शनास आले आहे.भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होवून सुध्दा दोषी दुकानदारावर कोणतीच कारवाही न करता शिधा वाटपाची परवांगी देवून पुरावे नष्ट करण्याची संधी संबधीत अधिकारी देत आहेत.या प्रकरणात पुरवठा विभागाचे अधिकारी हे राजकीय दबावाला बळी पडत असल्याचाही आरोप होत आहे,त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी चांदेकर यांनी केलेल्या कारवाईवर त्वरीत चौकशी करुन कापगते यांचे दुकान रद्द करावे अशी मागणी होऊ लागली आहे.