कंदील घेऊन वाराणसीमध्‍ये शोधणार विकास-लालू यादव

0
15
वृत्तसंस्था 
पाटणा (बिहार) दि. ८ बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहिर झाल्यानंतर आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव आणि नितीशकुमार यांनी गळाभेट घेऊन एकमेकांचे अभिनंदन केले. लालू यादव म्हणाले, या निकालाचा दुरगामी परिणाम होणार आहे. तर, नितीशकुमार म्हणाले, या निवडणुकीने निश्चित केले आहे की राष्ट्रीय पातळीवर लोकांना सशक्त विरोधीपक्ष हवा आहे आणि सर्वांच्या नजरा बिहारवर लागल्या होत्या. सर्वांना विश्वास होता की बिहारचा निकाल चांगला लागला तर त्याचा राष्ट्रीय राजकारणावर परिणाम होईल. लोकांना सशक्त विरोधीपक्ष हवा आहे.

विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळविल्यानतंर नितीशकुमार आणि लालू यादव यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. नितीशकुमार म्हणाले, हा बिहारच्या स्वाभिमानाचा विजय आहे. जे सांगत होते ही काट्याची टक्कर आहे त्यांना जनतेने चोख उत्तर दिले आहे. समाजाच्या प्रत्येक स्तरातून आम्हाला पाठिंबा मिळाला आहे. कोणीच त्यात मागे राहिलेले नाही. महाआघाडीने एकजूट होऊन निवडणूक लढविली. निवडणुकीदरम्यान आक्रमक प्रचार झाला. त्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली ते सर्व कयास बिहारी जनतेने दूर केले. हा फार मोठा विजय आहे आम्ही तो नम्रपण स्विकारतो.
समाजातील प्रत्येक स्तरावरील व्यक्तीच्या आशा-आकांक्षांची आम्हाला जाणिव आहे. त्यानूसारच आम्ही यापुढे काम करु. आम्ही जी एकजूट दाखविली होती लोकांनी त्या एकजुटतेलाच जनादेश दिला. आमच्या मनात कोणाबद्दलही आकस नाही. सकारात्मक विचारांनी आम्ही यापुढे काम करु.
उद्धव ठाकरे – मुलायमसिंहांना धन्यवाद विजयानंतर आमचे कार्यकर्ते उन्माद करणार नाहीत. आम्ही भाजपची खिल्ली उडविणार नाही, असे सांगत नितीशकुमारांनी विरोधकांचा आम्ही सन्मान करु असे सांगितले. आम्ही असे काम करु की लोकांचा विश्वास वाढला पाहिजे. नितीशकुमार म्हणाले, पंतप्रधांनांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आमची इच्छा आहे की केंद्राचे आम्हाला सहकार्य मिळेल. बिहारच्या विकासासाठी सकारात्मक धोरण राहील. नितीशकुमारांनी विजयाच्या शुभेच्छा देणाऱ्या सोनिया गांधी, राहुल गांधी, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, समाजवादी प्रमुख मुलायमसिंह यादव, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बिहार भाजप नेते सुशील मोदी यांना धन्यवाद दिले.

महाआघाडीच्या विजयाचा सर्वात जास्त आनंद काँग्रेसला आहे. मागील विधानसभेत फक्त चार जागांवर असलेली काँग्रेस 26 जागांवर  आहे. कल येण्यास सुरुवात झाल्यानंतर काँग्रेसच्या दिल्लीतील मुख्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यालयाबाहेर फटाके फोडण्यास सुरुवात झाली. हीच परिस्थिती पाटण्यात आरजेडी आणि जेडीयूच्या कार्यालयाबाहेर होती.