३२ लाखांचे बक्षिस असलेल्या नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

0
9

गडचिरोली,दि.10- मागील पंधरवडयात सुमारे ३२ लाखांचे बक्षिस असलेल्या ८ जहाल नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले असून, त्यात कमांडर व उपकमांडरचाही समावेश आहे. जिल्हा पोलिस राबवीत असलेल्या नवजीवन योजनेचे हे यश असल्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.पोलीस दलाला ‘नक्षल आत्मसमर्पण’ मोहिमेत मोठे यश आले आहे. पोलिस दलासमोर कमांडर, उपकमांडरसह ३२ लाखांचे बक्षिस असलेले एकूण आठ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले  आहे. यापूर्वी देखील गडचिरोली पोलिसांना अशा प्रकारचे यश मिळाले आहे.कंपनी क्र. २ च्या सेक्शन कमांडर आणि उपकमांडर असलेल्या दीपक ओक्षा आणि मनीषा मडावी या नक्षल दाम्पत्याचे शस्त्रेखाली ठेवणा-यांत सहभाग आहे. आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये

१) दीपक ओक्षा- कंपनी क्र. २ चा सेक्शन कमांडर – बक्षीस ८ लाख

२)पत्नी -मनीषा मडावी-कंपनी क्र. २ ची सेक्शन उपकमांडर-बक्षीस ६ लाख

३)विष्णू मडावी -गरिबाबंद दलम उपकमांडर -छत्तीसगड- बक्षीस ६ लाख

४)ऋषी कोला- प्लाटून ३ सदस्य – बक्षीस ४ लाख

५) फिरोज कोला -कसनसूर दलम -डॉक्टर रुपात कार्यरत-बक्षीस २ लाख

६) सुनिता तलांडी-अहेरी एल ओ एस सदस्य – बक्षीस २ लाख

७) तिरुपती हिचामी-कसनसूर एल ओ एस सदस्य

८) दसरू पल्लो-जनमिलीशिया कमांडर – बक्षीस २ लाख अशी आत्मसमर्पण करणा-या नक्षलवाद्यांची नावे आहेत.