संगणक परिचालकांवर पोलिसांचा लाठी हल्ला

0
13

पोलिसांच्या लाठीहल्यात 10 जखमी

4 आंदोलक ठार झाल्याची चर्चा

नागपूर (दि.16)- राज्यभरातील संगणक परिचालकांचे आपल्या मागण्यांना घेऊन हिवाळी अधिवेशनादरम्यान उपराजधानीत गेल्या तीन दिवसापासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. आज सकाळीच या आंदोलकांची पोलिसांची बाचाबाची झाल्याने पोलिसांनी या आंदोलकांवर लाठी हल्ला चढविला. यामध्ये दहा संगणक परिचालक जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या लाठीमारामुळे 4 आंदोलक ठार झाल्याची चर्चा सुरू आहे. अधिक माहिती मिळू शकली नाही.

सविस्तर वृत्त असे की, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आपल्या मागण्या सरकार दरबारी मांडण्यासाठी संगणक परिचालकांनी राज्यस्तरीय ठिय्या आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाकडे राज्यरसरकारचे दुर्लक्ष आहे. आज सकाळी या आंदोलकांची पोलिसांसोबत बाचाबाची झाल्याचे सांगण्यात येते. यामुळे पोलिसांनी हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी आंदोलकांवर तुफान लाठी हल्ला केला. यात सुमारे 10 आंदोलक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या लाठीहल्ल्यात 4 आंदोलक ठार झाल्याची चर्चा आहे.