ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमध्‍ये प्रवाशाच्‍या जेवणात आढळले झुरळ

0
14
रांची- नागपूरहून रायपूरकडे निघालेल्‍या ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमध्‍ये एका प्रवाश्‍ााच्‍या जेवणात शनिवारी झुरळ आढळले. रेल्‍वेकडून मिळालेल्‍या पदार्थांबाबत या प्रवाशाने तक्रार करत संताप व्‍यक्‍त केला व सोशल मीडियावर फोटो अपलोड केले. हे फोटो मोठ्या प्रमाणात व्‍हायरल झाले आहेत.ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्‍या एसी क्लासमधील बोगी नंबर-1 च्‍या 18 क्रमांकाच्‍या सीटवर एस. के. तरूण विजय हे प्रवास करत होते.जेवण करताना त्‍यांना भातामध्‍ये मेलेले झुरळ आढळले.झुरळाची माहिती मिळताच त्‍यांच्‍या बोगीतील सर्वांनी जेवण टाळले. तरुण यांनी रेल्‍वेच्‍या तक्रार बुकात ऑपरेटरची तक्रार नाेंदवली.