देवरीत राष्ट्रसंतांचा पुण्यतिथी महोत्सव येत्या शनिवारी

0
8

 

देवरी- येत्या शनिवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या देवरी शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाची सांगता रविवार (ता.२७) रोजी होणार आहे.
या दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन स्थानिक पंचशील चौकस्थित समाज मंदिरात करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी ५ वाजता महाराजांच्या प्रतिमेची स्थापना देवरीच्या प्रथम नगराध्यक्ष सुमन बिसेन यांचे हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी माया निर्वाण, यादवराव पंचमवार, कोकिळा दखने, पारबता चांदेवार, विनोद अग्रवाल, बाबूराव क्षीरसागर, आर. टी. मेश्राम हे उपस्थित राहणार आहेत. यानंतर सामुदायिक ध्यान, योगासन व प्राणायाम, रामधुन. ग्रामगीता वाचन, भजन, रक्तदान शिबिर व रांगोळी स्पर्धा, चर्चासत्र,सत्कार समारंभ, रात्री सप्तखंजरीवादक तुषार सूर्यवंशी यांचे जाहीर किर्तन तर दुसèया दिवशी वकृत्वस्पर्धा, गायन स्पर्धा, गोपालकाला, वंदनीय राष्ट्रसंत विचारमाला आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रसंतांच्या या पुण्यतिथी महोत्सवाला नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामसेवाधिकारी तुकाराम राणे, रामचंद्र राऊत,चंद्रकांत आंबिलकर, कुलदीप लांजेवार,ओमप्रकाश रामटेके, चंद्रशेखर अगळे आदींनी केले आहे.