रेल्वेचे तत्काळ तिकीट ३३ टक्क्यांपर्यंत महाग

0
8
मुंबई दि.२५-रेल्वे प्रशासनाने तत्काळ तिकिटांच्या शुल्कात ३३ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. नवीन दर २५ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू होतील. स्लीपर कोचसाठी तत्काळ शुल्क ९० रुपयांवरून १७५ रुपये केले. सेकंड सीटिंगसाठीचे शुल्क १० रुपयांवरुन १५ रुपये करण्यात आले आहे. वातानुकूलित तृतीय श्रेणीचे तात्काळ शुल्क २५० रुपयांवरून ३०० रुपयांपर्यंत वाढवले अाहे. वातानुकूलित द्वितीय श्रेणीचे तत्काळ शुल्क ३०० रुपयांवरून ४०० पर्यंत महाग झाले. त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह श्रेणीसाठी तत्काळ शुल्क ४०० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात आले आहे.
रेल्वे बोर्डाने तत्काळ तिकिटांच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी २५ डिसेबरपासून होईल. देशातील सर्व विभागांना हा निर्णय लागू राहणार आहे.