रविवारी नागपूरात विदर्भस्तरीय ओबीसी कार्यकर्ता परिषद

0
9

गोंदिय,दि.25- वर्षानुवर्षापासून ओबीसींच्या मागण्याकडे कानाडोळा करणार्या सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी व्ही.पी.सिंग सामाजिक न्यायमंचातर्फे रविवार 27 डिसेंबरला विदर्भस्तरीय ओबीसी कार्यकर्ता परिषदेचे आयोजन  दुपारी 12 वाजता , पुर्णबूटी सभागृह रामदासपेठ येथे आयोजित केली आहे. परिषदेचे उदघाटन  आमदार  विजयभाऊ वडेट्टीवार  यांच्या हस्ते होणार आहे.तर परिषदेचे अध्यक्ष खासदार नानाभाऊ पडोळे राहणार आहेत.प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री रामदास बोडखे,कवी सुधाकर गायधनी,माजी आमदार पांडुरग ढाले,सुधाकर गणगणे,मोहन मते,माजी महापौर विकास ठाकरे,पांडुरंग हिवरकर,ज्ञानेश वाकुडकर,नुतन माळवी,गिरिश पांडव,सलिल देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत.

परिषदेत ओबीसीसाठी असलेल्या योजना,उपक्रमावर चिंतन करण्यात येणार आहे.ओबीसींच्या कल्याणासाठी लागू केलेल्या मंडल आयोगाला 25 वर्ष पुर्ण होत आहेत,यावरही परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे.मंडल आयोगाने केलेल्या तरतुदीचे आत्तापयर्ंत झालेले पालन आणि सामाजिक न्याय विभागाने ओबीसीसाठी केेलेल्या कार्याचा आढावा घेण्यात येणार आहे.या परिषदेला ओबीसी चळवळीशी जुडलेल्या सर्व प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते यांना उपस्थित राहण्याचे आवाहन विदर्भस्तरीय ओबीसीच्या सर्व संघटनाच्यावतीने आवाहन सचिन राजूरकर, नितिन चौधरी, बबनराव फंड, अरूण पा. मुनघाटे, येलेकर सर, खेमेद कटरे , बबलू कटरे, सावन डोये, हिराचंद बोरकूटे, दिनेश चोखारे ,अमर वर्हाडे, गोंविद भेंडारकर , विजय पिदुरकर,राजीव ठकरेले,चंद्रकुमार बहेकार,कैलास भेलावे,रमेश ब्राम्हणकर,प्रा.संजय रहागंडाले,विनायक येडेवार,प्रा.राजेंद्र पटले,लिलाधर पाथोडे,उध्दव मेहदंळे, गुरनुले सर,रवि पिसे,राकेश तलमले आदींनी केले आहे