नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक, तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान

0
5

गोंदिया,दि.13-महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत दामर लगतच्या संड्रा जंगलात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये  आज सकाळी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीसांना यश आले आहे.ही कारवाई छत्तीसगड आणि गडचिरोली पोलीसांनी सयुक्तपणे केली असून अद्यापही कारवाई सुरु असल्याचे वृत्त आहे.यातील एका नक्षलवाद्याचा मृतदेह पोलींसाच्या हाती लागला आहे.

 पोलिसांनी ५ बंदुका घटनास्थळावरून जप्त केल्या आहेत.त्याच प्रमाणे दुसऱ्या घटनेत छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी भुसूरुंगस्फोट घडवून आणला. यात तीन सीआरपीएफ जवान जखमी झाले आहेत. ही घटना दंतेवाडा जिल्ह्यात घडली. रस्ता सुरु करायला निघालेल्या सीआरपीएफच्या पथकावर हा हल्ला झाला.