अनंतनाग जिल्ह्यात पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला

0
13
श्रीनगर (वृत्तसंस्था)- जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यावर दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या ग्रेनेड हल्ला दोन जवानांसह दोन नागरिक जखमी झाले आहेत.
 
लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा पोलिस ठाण्यावर दहशतवाद्यांनी आज (शनिवार) सकाळी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवानांसह दोन नागरिक जखमी झाले असून, त्यांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
बिजबेहरा हा भाग जम्मू काश्मीरचे दिवंगत मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचा मतदारसंघ आहे.