नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील माई टी2 चा मृत्यु

0
8
खेमेंद्र कटरे
गोंदिया-गोंदिया -भंडारा जिल्ह्यातील नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र राहिलेल्या माई टी 2 या वाघीणीचा आज अचानक दुपारच्या सुमारास मृत्यु झाल्याचे आढळून आले.जय या वाघाची माई ही आई आहे.नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील तिरोडा मार्गाकडे असलेल्या चोरखमारा गेट भागात डाव्या बाजुच्या भागात आतमध्ये मोठी जखम झाल्याने तिचा मृत्यु झालाच्या अंदाज आहे.IMG-20160507-WA0106गोंदिया-भंडारा जिल्ह्याला नावलौकिक मिळवून देणाèया नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील आपल्या उमद्या देखणेपणामुळे अनेकांना भुरळ पाडणाèया ङ्कमाईङ्क ऊर्फ ङ्कमाहीङ्क या सर्वांत वयोवृद्ध वाघिणीचा शनिवारी दुपारी ३ वाजता चोरखमारा गेटजवळील पाणवठ्यात मृत्यू झाला. ती काही दिवसांपासून जखमी होती. नागझिरा व्याघ्र प्रकल्पात मागील १४ वर्षांपासून सुरू असलेला तिचा प्रवास शनिवारी संपल्यानंतर वन्यप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.जय उमरेड कèहांडलामध्ये पर्यटकांना आकर्षित करणाèया जय ची माई आई.
माई ही मागील १४ वर्षांपासून नागझिरा जंगलात वास्तव्यास होती. दोन-तीन दिवसांपूर्वी ती शिकारीसाठी निघाली असता रानगव्याने तिच्यावर हल्ला केल्याने ती जखमी झाली होती. वन्यजीव विभागाची तिच्यावर निगराणी होती. पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या चमूचेही तिच्यावर लक्ष होते. जखमी अवस्थेत ती चोरखमारा गेटजवळील पाणवठ्यातच बसून होती.रानगव्याच्या हल्यात तिच्या कंबरेवर गंभीर दुखापत झाली होती. बराच वेळेपर्यंत ती पाणवठ्यावरच बसून होती. त्यामुळे तिच्यावर उपचार करणेही अशक्य होते. अखेरीस दुपारी ३ च्या सुमारास पाणवठ्यावरच तिचा मृत्यू झाला.
सन २००५ पासून माही ही नागझिरा अभयारण्याची शान होती. अत्यंत सुंदर आणि देखणी असल्यामुळे ती दिसावी म्हणून अनेक पर्यटक दूरवरून नागझिèयात येत होते. तिला ङ्कटी.-२ङ्क असेही संबोधले जायचे. तिच्या जाण्याने आता फक्त ङ्कटी.-४ङ्क नावाचा वाघ नागझिèयात आहे. तिने आजपर्यंत नागझिèयाला अनेक वाघ दिले. म्हणूनच तिला ङ्कमाईङ्क असे संबोधले जात होते. देशात प्रसिद्धीस आलेला व सध्या उमरेड-कèहांडला अभयारण्यात वास्तव्यास असलेला जय नावाचा वाघ हा तिचाच. याशिवाय प्रिन्स व विरु हे वाघही तिचेच आहेत. सध्या प्रिन्स हा पेंच अभयारण्यात तर विरु हा मध्यप्रदेशातील जंगलात आहे.
अत्यंत निडर असलेली माही पर्यटकांना हमखास दर्शन द्यायची. रस्त्याने जाताना आपल्या खास शैलीत पर्यटकांच्या वाहनाजवळही ती जायची. आपल्या निडरतेचा वारसा तिने जय व विरु या वाघांनाही शिकविला होता. त्यामुळेच आज हे दोन्ही वाघ पर्यटकांच्या विशेष पसंतीचे आहेत. तिच्या मृत्यूची माहिती मिळताच नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे संचालक रविकांत गोवेकर, पशुवैद्यकीय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. वंजारी,मानद वन्यजीव संरक्षक सावन बहेकार, वन विभागाच्या अधिकाèयांनी भेट दिली. संध्याकाळी शवविच्छेदनानंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या निधनामुळे शनिवारी चोरखमारा गेटवरून पर्यटकांचा प्रवेश बंद करण्यात आला. या गेटवरून सर्व पर्यटकांना न्यू नागझिरा गेटवरून आत सोडण्यात आले. तिच्या मृत्यूमुळे पिटेझरी व चोरखमारा गेटवरील गाईडसचेही डोळे पाणावले होते.