अनधिकृत व्यापारी गाळे बांधकामासंदर्भात जिल्हाधिकाèयांचे निर्देश

0
17

आमगाव- येथील अनधिकृत व्यापारी गाळे बांधकाम संदर्भात नागरिकांनी ६ मे ला जिल्हाधिकारी यांची भेट घेतली.यावेळी त्यांनी सविस्तर प्रकरणाची दखल घेत सदर अनधिकृत बांधकाम संदर्भात कारवाई करण्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या शिष्टमंडळाला प्रकरणात तत्काळ दखल घेणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. आमगाव : आमगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या महसूल झुडपी जंगल या जागेवर जिल्हा परिषद अंतर्गत अनधिकृत व्यापारी गाळे बांधकाम करण्यात येत आहे. सदर बांधकाम विरूध्द न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. कार्यवाही अभियंता यांनी बांधकाम बंद करण्याचे लेखी निर्देश दिले.परंतु या वरिष्ठ अधिकाèयांच्या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आली.
या अवैध बांधकामाला उपविभागीय अधिकारी पी.पी.वाघाये व शाखा अभियंता विजय ढोमणे यांनी बांधकामाला बंद करण्यास नकार दिला.याविरूध्द नागरिक ९ मेपासून आमरण उपोषणाला बसण्याचे लेखी निवेदन दिले आहे.
आमगाव ग्रामपंचायत अंतर्गत भूमापन महसूल गट क्रं.२३५ व २३६ या महसूल व झुडपी जंगल वनविभाग यांच्या मालकी जागेवर जिल्हा परिषद व अधिकाèयांनी आर्थिक व्यवहार घडवून अनधिकृत व्यापारी गाळे बांधकामाला मंजूरी मिळविली. बांधकामपूर्वी महसूल व वनविभाग यांच्याकडून जमीनीचे हस्तांतरण व बांधका परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांनी या अनधिकृत बांधकाम विरूध्द उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे जनहित याचीका दाखल केली. सदर बांधकाम बंद करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आला.
सदर अनधिकृत बांधकाम बंद करून त्याचा अहवाल सादर करण्यासाठी उपविभागीय अधिकारी सा.बा. जि.प.उपविभाग आमगाव यांना दिनांक ५एप्रिल २०१६ ला लेखी निर्देश दिले.शासन परिपत्रकाप्रमाणे तक्रार नोंदविण्यासाठी ३मे २०१६ ला पत्र दिले. त्याचप्रमाणे सदर अनधिकृत बांधकाम बंद करण्यासाठी कार्यकारी अभियंता जि.प.सा.बा.विभाग यांनी उपविभागीय अधिकारी जि.प.सा.बा. पी.पी.वाघाये यांना ३मे २०१६ ला लेखी पत्र दिले. परंतु या पत्राला उपविभागीय अधिकारी पी.पी.वाघाये व शाखा अभियंता विजय ढोमणे यांनी केराची टोपली दाखवून सदर अनधिकृत बांधकाम बंद करण्यास नकार दिला.त्यामुळे या सदर बांधकामाविरूध्द नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
अधिकाèयांच्या बेबंदशाहीला त्यांच्या विरूध्द फौजदारी कारवाई व्हावी यासाठी नागरिकांनी ९ मे पासून तहसील कार्यालय समोर उपोषण करण्याचे लेखी पत्र संबंधित विभागांना दिले आहेत.
वाघाये व ढोमणेच्या हेकेखोरपणामुळे प्रशासनाची शोकांतिका अनधिकृत व्यापारी गाळे बांधकाम बंद करण्याचे लेखी आदेश कार्यकारी अभियंता जि.प.गोंदिया व तहसीलदार आमगाव यांनी उपविभागीय अधिकारी पी.पी.वाघाये शाखा अभियंता विजय ढोमणे यांना दिले.
परंतु वरिष्ठ प्रशासकीय अधिकाèयांच्या प्रशासकीय लेखी पत्राला न जुमानता बांधकाम सुरू ठेवले आहे.या मुजोर शाहीमुळे संपूर्ण प्रशासनाची शोकांतिका आहे.या मुजोर अधिकाèयांविरुध्द शासनाने कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे मत वरिष्ठ अधिकाèयांनी व्यक्त केली आहे.
ग्रामसभेने अनधिकृत बांधकाम बंद करून ते पाडण्याच्या ठराव आमगाव ग्रामपंचायत येथे आयोजित ग्रामसभेने केला आहे. जि.प.च्या अनधिकृत बांधकामाला प्रखर विरोध करीत सदर बांधकाम बंद करून पाडण्याचे ठराव एकमताने संमत केला आहे.