नगरपालिकेच्या निवडणुकीत ‘विदर्भ माझा‘चे उमेदवार

0
7

संस्थापक राजकुमार तिरपुडे यांची पत्रकार परिषदेतून माहिती
फोटो
गोंदिया,दि. १२ : १६ जानेवारी २०१६ ला ‘विदर्भ माझा‘ या राजकीय पक्षाची मुहुर्त‘मेढ रोवली. या पक्षाच्या माध्यमातून विदर्भ राज्यासह विदर्भातील ज्वलंत प्रश्न मांडण्याचा आपला प्रयत्न असेल. ऑक्टोबर, नोव्हेंबर २०१६ आणि जानेवारी २०१७ मध्ये विदर्भातील ६० नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत आपला पक्ष उमेदवार उभा करेल, असे संस्थापक राजकुमार तिरपुडे यांनी सांगितले.यावेळी त्यांच्यासोबत सरचिटमीस मंगेश तेलंग ,विरेंद्र जायस्वाल,राजधऱ भेलावे उपस्थित होते.
येथील शासकिय विश्रामगृहात गुरूवारी (ता. १२) पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या वेळी ते बोलत होते.
तिरपुडे म्हणाले, विदर्भात मुबलक साधनसपंत्ती असताना शासन, प्रशासनाकडून वारंवार विदर्भातील जनतेवर अन्याय केला जात आहे. उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, कृषी आदी क्षेत्र उपेक्षित आहेत. त्यामुळे विदर्भ आजही प्रत्येक बाबतीत मागे आहे. भौगोलिक दृष्टिकोणातून भारताच्या मध्यभागी असलेला विदर्भ साधन संपत्तीने समृद्ध आहे. असे असतानाही विकासाच्या प्रतीक्षेत आहे. शेतकरी आत्महत्या ही विदर्भातील ज्वलंत समस्या आहे. या सर्व समस्या सोडविण्यासाठी वेगळा विदर्भ राज्य हाच एकमेव पर्याय आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्यावर भारतीय जनता पक्षाने निवडणूक जिंकली. मात्र सत्ता स्थापनेनंतर या पक्षाला विदर्भ राज्याचा विसर पडला, असाही आरोप तिरपुडे यांनी केला.
स्वतंत्र विदर्भ राज्याचे कट्टर पुरस्कर्ते तथा महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून, विदर्भाच्या विकासासाठी १६ जानेवारी २०१६ ला ‘विदर्भ माझा‘ या राजकीय पक्षाची स्थापना केली, असे सांगत तिरपुडे यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती, दलित, आदिवासी, महिला व विद्यार्थिनींचे सक्षमीकरण, कृषी विकास, रोजगार, ग्रामविकास, उद्योग आदींना प्रोत्साहन हे पक्षाचे प्रमुख उद्देश असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया आणि तिरोडा या नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत ‘विदर्भ माझा‘चे उमेदवार उभे करू, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.