पाटणा- दिल्ली एअरअॅम्बुलन्सचा अपघात

0
9

नवी दिल्ली- पाटण्याहून दिल्लीला येणारे एअर अॅम्बुलन्सचे मंगळवारी नजफगडजवळ खैर गावातील एका शेतात इमरजन्सी लॅंडिंग करण्यात आले. विमानात 7 प्रवासी होते. सर्व प्रवाशी सुखरुप असल्याची माहिती मिळाली आहे. दुपारी 2.45 वाजता ही दुर्घटना घडली.

मिळालेली माहिती अशी की, एअर अॅम्बुलन्सचे इंजिन फेल झाल्याने वैमानिकाने प्रसंगावधान राखून एअरपोर्टच्या शेजारी असलेल्या एका शेतात इमरजन्सी लॅंडिंग केले. या घटनेला क्रॅश लॅंडिंग असेही संबोधले जाते.

– DM मधु तेवतिया यांनी सांगितले की, अलकेमिस्ट एअरलाईन्सचे एअर अॅम्बुलन्स पाटण्याहून दिल्लीला येत होते. एका रुग्णाला मेदांता रुग्णालयात आणले जात होते. रुग्णासोबत डॉक्टरांचे पथक होते. सर्व सुखरुप आहेत.