चक्रीवादळ बाधितांना त्वरित भरपाई द्या-जीतेश राणे

0
7
गोंदिया : शनिवारी आलेल्या चक्रीवादळाने जनजीवन विस्कळीत झाले. जिल्हाभरातील अनेक गावांत नागरिकांचे मोठेच नुकसान झाले. शेतपीक नष्ट झाले. शेकडो घरांच्या भिंती कोसळल्या. छत उडाले. काही ठिकाणी जनावरांचा मृत्यू झाला. भाजीपाला व फळ उत्पादक शेतकNयांचे वृक्ष पडल्याने मोठे नुकसान झाले. पशूधनाची हानी झाली. विद्युत पोल पडले. चक्रीवादळ आल्याने झालेल्या नुकसानीचा योग्य सव्र्हे करून प्रशासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जीतेश राणे यांनी केली आहे.
संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांचे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकNयांचे झालेले नुकसान बघता अधिकाधिक सहायत प्रदान करण्याची मागणी राणे यांनी केली आहे. जिल्ह्यात यावर्षी कमी पाऊस पडल्याने आधीच शेतकरी त्रस्त आहेत. यावर्षी विंधन विहिरींच्या भरवशावर शेतकNयांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान लावले. काही पाटबंधारे विभागाचे पाण्यावर रब्बी लागवड केली. अनेक शेतकNयांनी भाजीपाला व फळपिके लावली. परंतु एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस, चक्रीवादळ व दोन दिवसांपूर्वी २१ मे रोजी संपूर्ण जिल्ह्यात आलेल्या चक्रीवादळाने शेतकरी व नागरिकांचे मोठेच नुकसान झाले. शेतकरी व शेतमजुरांचे घरे पडली. जनावरांचे गोठे कोसळल्यामुळे जनावरांचा मृत्यू झाला. भिंती पडल्या व छत उडाल्यामुळे अनेकांना उघड्यावर राहण्याची पाळी आली आहे. अनेकदा चुकीच्या सर्वेक्षणामुळे अनेक नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहतात. त्यामुळे योग्य सर्वेक्षण व्हावे याकरीता वरिष्ठांनी लक्ष घालावे, गरजुंना प्रशासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जीतेश राणे यांनी केली आहे.