ओडिशात वीज पडून 17 जणांचा मृत्यू

0
11

वनेश्वर, दि. 2- ओडिशामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसात वीज पडून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर वीज दुर्घटनेत 9 जण जखमी झाल्याची माहिती एएनआयनं दिली आहे.या मुसळधार पावसानं दक्षिणी आणि सागरी भाग प्रभावित झाला असून, मोठ्या प्रमाणात नैसर्गिक दुर्घटना झाल्या आहेत. केंद्रपाडा, भद्रक, गंजम, खुर्दा आणि मयूरभंज जिल्ह्यात पावसानं अधिक नुकसान झालं आहे.