तुमसर शहर विदर्भराज्य आंदोलन समिती गठित

0
12

तुमसर,दि.26- विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा भंडाराच्या वतीने (दि.२५) शनिवारला माजी आमदार अॅड. आनंदरावजी वंजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी आमदार मधुकरजी कुकडे यांच्या अध्यक्षतेखाली तुमसर येथील साई नर्सिंग काॅलेजच्या सभागृहात बैठक घेण्यात आली.या बैठकित सर्वानुमते विदर्भ राज्य आंदोलन समिती तुमसर शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समिती भंडाराचे कोअर कमिटी सदस्य व जिल्हा समन्वयक माजी आमदार मधुकरजी कुकडे, कोर कमिटी सदस्य व जिल्हा प्रभारी माजी आमदार अॅड. आनंदरावजी वंजारी, जिल्हा युवा अध्यक्ष तुषार हटेवार,शहर अध्यक्ष प्रमोद मानापुरे, जिल्हा उपाध्यक्ष वासुदेवराव नेवारे , कोषाध्यक्ष अर्जुन सुर्यवंशी,उपाध्यक्ष दामोदर क्षीरसागर, प्रकाश थानथराटे, विजयकुमार दुबे उपस्थित होते.सभेचे संचालन हनुमंतराव मेटे यांनी तर आभार सचिन बडवाईक यांनी मानले.