मध्य प्रदेशात पुरात 6 जण वाहून गेले

0
5

वृत्तसंस्था
भोपाळ,दि.09 – गेल्या 24 तासापासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे मध्यप्रदेशातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसाने सहा बळी घेतले असून मुरैना जिल्ह्यातील चंबळ नदीत तीन युवक तर दमोह, मंडला आणि सिवना येथे दोन महिलांसह एक व्यक्ती वाहून गेल्लाची घटना घडली.सतना, रीवा येथे जोरदार पाऊस आणि नुकासान झाल्यानंतर शनिवार सकाळपासून भोपाळ, रायसेन, पचमढी, होशंगाबाद, इटारसी येथे मुसळधार पाऊस सुरु आहे. mp_rain_6_1468059314
बालाघाट जिल्ह्यातही अतिवृष्टीचा इशारा देत लोकनिर्माण विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष पटेल यांनी जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व प्रशासकीय यंत्रणेला दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत.पावसामुळे मध्यप्रदेशातील अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागात लोकांना जीवनावश्यक वस्तूंसाठी झगडावे लागत आहे.नरसिंहपूर, होशंगाबादसह अनेक भागात लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत.भोपाळमध्ये रात्रभर पाऊस कोसळत असल्यामुळे अनेक भागांचे बेटात रुपांतर झाले आहे.राज्यात जिथे सतत पाऊस होत आहे त्या जिल्ह्यातील शाळांना आज सुटी देण्यात आली.