भंडारा जिल्हा दुग्धसंघाच्या अध्यक्षपदी रामलाल चौधरी

0
14

भंडारा,दि.09- भंडारा जिल्हा दुग्ध संघाच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत रामलाल चौधरी यांची निवड करण्यात आली.विशेष म्हणजे चौधरी हे आदी दुसर्या पॅ्नलकडून जिंकून आले होते.नंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देऊन भंडारा जिल्हा दुग्ध संघाच्या अध्यक्षपदाची माळ घालण्यात आली.खासदार प्रफुल पटेल व आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात चौधरी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी,माजी मंत्री नाना पंचबुध्दे ,भंडारा जिल्हा बँकेेचे अध्यक्ष सुनिल फुंडे,दुग्ध संंघाचे माजी अध्यक्ष विलास काटेखाये, महेंद्र गडकरी, नरेंद्र झंजाड, हितेश सेलोकर, सुभाष तितिरमारे तथा समस्त पदाधिकारीनी त्यांचे स्वागत केले.यावेळी सर्वांनी त्यांचं अभिनंदन करुन पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.