रंग गेला नाही तरच नवी नोट बनावट समजा – अर्थसचिव

0
15
नवी दिल्ली, दि.15 – बाजारात आलेल्या 2 हजारच्या नव्या नोटेचा रंग उडाल्याचे काही प्रकार समोर आले आहेत. यासंबंधी अर्थसचिव शक्तीकांत दास यांना आजच्या  पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर दास यांनी नव्या नोटांचा रंग जाणे ही सामन्य बाब असल्याचे सांगितले.
नोटांचा रंग उडत असेल तर चिंता करु नका. पण तुमच्याकडे जी दोन हजारची नवी कोरी नोट आहे तिचा रंग उडत नसेल तर ते नोट बनावट असल्याचे चिन्ह समजावे अशी माहिती दास यांनी दिली. नव्या 2 हजारच्या नोटेचा रंग उडत असल्यामुळे त्या नोटा बनावट आहेत ही निव्वळ अफवा असल्याचे त्यांनी सांगितले.
शंभर रुपयासह ज्या ख-या नोटा आहेत त्यांच्यामध्ये ज्या प्रकारची शाई वापरली आहे त्यामुळे काही प्रमाणात रंग उडतो. तुम्ही कापूस नोटेवर घासल्यानंतर रंग उडाला नाही तर ती नोट बनावट समजावी, असे त्यांनी सांगितले.