कुप्रथावर मात करण्यासाठी मुली सक्षम व्हायला हवे-डॉ.पुलकुंडवार

0
10

गोंदिया,दि.15 – आजच्या युगात मुलगी ही मुलाच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात कार्य करीत असून विविध क्षेत्रामध्ये आपली वेगळी प्रतिमा सुध्दा निर्माण केली आहे.त्यासोबतच आपल्या समाजामध्ये असलेल्या अनिष्ठ रुढी,परंपंरा व कुप्रथावर आळा घालून मुलींंना कसे सक्षम करता येईल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे विचार सीईओ डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त केले.ते गोंदिया जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने बालदिनी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.सध्याच्या युगात मुलीवंर अत्याचाराचे प्रमाण सातत्याने वाढत असून त्यावर आळा घालण्याची जबाबदारी आ्रपण सर्वांची आहे.सोबतच कुप्रथांवर आळा घालण्यासाठी प्रत्येक पालकांने मुलीच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे असेही ते म्हणाले.यावेळी महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे.एम.अंबादे उपस्थित होते.याप्रसंगी शासनाच्या महिला बालकल्याण विभागामार्फेत राबविण्यात येत असलेल्या माझी कन्या भाग्यश्री योजनेतंर्गत एक व दोन मुलीवर शस्त्रक्रिया करणाèया ८ दाम्पत्याचा व मुलींचा सत्कार करुन प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाला महिला बालकल्याण विभागाच्या पर्यवेक्षीका ,अंगणवाडीसेविका व इतर कर्मचारी उपस्थित होते.