मान्सून अंदमानात दाखल

0
16

पुणे, दि. 14 – हवामान विभागाने आनंदाची बातमी दिली आहे. मान्सून अंदमानच्या दक्षिण समुद्र, निकोबार बेट, आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागात दाखल झाला असल्याचे हवामान विभागाने रविवारी दुपारी जाहीर केले. त्या परिसरात पडत असलेला पाऊस, वा-यांचा वेग या बाबी लक्षात घेऊन अंदमानमध्ये मान्सून दाखल झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. पुढील ७२ तासात बंगालच्या उपसागरातील आणखी काही भाग, अंदमान समुद्राचा उर्वरित भाग, निकोबार बेटे आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात आगमन होण्याच्या दृष्टीने अनुकुल स्थिती असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

यापुर्वी हवामान विभागाने अगोदर 15 मेला मान्सून अंदमानला येईल असे जाहीर केले होते. गेल्या महिन्यात मान्सूनचा प्राथमिक अंदाज व्यक्त करताना हवामान विभागाने यंदा मान्सून ९६ टक्के होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता अल निनोचा प्रभाव कमी झाल्याने आणि गेल्या तीन आठवड्यांत परिस्थिती अनुकूल झाल्याने यावेळी देशभरात सरासरीहून जास्त पाऊस पडेल, असा सुधारित अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे़