लश्करच्या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

0
5
श्रीनगर दि.14- जम्मू-कश्मिरच्या हंदवाड़ा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी दुपारी अचानक चकमक उडाली आहे. कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा परिसर-वारिपोरा गावात लश्कर ए-तोयबाचे दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने परिसरात शोध मोहिम राबवली असता सुरक्षा रक्षकांवर गोळीबार करण्यात आला. याचवेळी उडालेल्या चकमकीत 2 दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले असून चकमक सुरूच आहे.