लष्कराकडून 3 दहशतवाद्यांना कंठस्नान

0
12

श्रीनगर,दि.15(वृत्तसंस्था)- त्रालमधील सातोरा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू आहे. लष्कराकडून 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. त्राल परिसरात आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.चकमक सुरु असणारा भाग सुरक्षा दलांनी ताब्यात घेतला आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिजबिहाडा ते श्रीनगर आणि पंथाचौक-नौगाम-हैदरपोरा-बेमिना बाह्यवळण रस्ता आणि एचएमटी ते गांदरबल मार्ग हा भाग यासाठी संवेदनशील घोषित करण्यात आला आहे.