समाजाच्या उन्नती व संपन्नतेसाठी गॅस कने्नशन योजना

0
8

भंडारा,दि.15-:समाजाच्या उन्नती व संपन्नतेसाठी ही योजना असून जिल्हयातील सर्व लाभाथ्र्यांना कने्नशन घरापर्यंत पोहचविले जातील, याची दक्षता सर्व गॅस कंपन्यांनी घ्यावी, असे निर्देश खा. नाना पटोले यांनी दिले. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कने्नशन वितरणाचा कार्यक्रम जलाराम मंगल कार्यालय भंडारा येथे आयोजीत करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या गॅस वितरण सोहळयास निशी पशिने, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी धनंजय देशमुख, भंडारा एलपीजी असोसिएसनचे अध्यक्ष डी.एङ्क. कोचे, उज्जवला जिल्हा समन्वयक, विश्वास कमाने, एचपी गॅसचे विक्रय अधिकारी आदित्य टांक, इंडेनचे विक्रय अधिकारी अर्नव सुनगुप्ता उपस्थित होते. खा. पटोले पुढे म्हणाले की, भंडारा जिल्हयात उज्वला गॅस युनिट परिवारातील प्रमुख महिलांचे नावे वितरण करण्यात आले.
सन २०११ जनगणनेच्या यादीत ज्यांची नावे नाहीत त्यांना सुद्धा गॅस युनिट मिळण्याचे दृष्टीने भरीव प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन नाना पटोले यांनी दिले. यादीतून ज्याची नावे आली नाहीत,अशा वंचीतांची यादी पेट्रोलियम मंत्र्यांकडे लावून धरण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. गॅस कने्नशनची केवळ १०० रूपयात लाभाथ्र्यांना मिळणार आहे. उर्वरित र्नकंम शासन भरणार आहे. तसेच ५ किलोच्या गॅस सिलेंडरचे वितरण खा. पटोले यांचे हस्ते करण्यात आले. लाभाथ्र्यांना घरपोच गॅस युनिट लावून देण्यात येवून त्याबाबत योग्य काळजी घेण्यासाठी माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी एचपी वितरक किशोर गजभिये, हेडा इंडेनचे व्यवस्थापक राजू भुरे, सनील खन्ना, मीना एचपी गॅसचे महेश कोचे, लक्ष्मी गॅस पालांदूरचे हुकरे, भाग्योदय कोचे, नवखरे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास मोठया संख्येने लाभार्थी उपस्थित होते.