चांदा फोर्ट,नागभिच आणि मुल रेल्वेस्थानक उडविण्याची नक्सलवाद्यांकडून धमकी

0
15

चंद्रपूर,दि.29-नागभीड रेल्वेस्थानकावर रेल्वे स्थानक उडविण्याच्या धमकीचे नक्सलवाद्यांचे पत्र मिळाल्याचे रेल्वे प्रशासनासह पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. या पत्रानंतर रेल्वे पोलिसांसह पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून चांदा फोर्ट, मूल, नागभीड या सह इतर रेल्वे स्थानकावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हे पत्र फक्त दहशत पसरविण्यासाठी ठेवले कि हे नक्सल्यांचे पत्र आहे या दिशेने तपास सुरु आहे. तीन दिवसापूर्वी नागभीड रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांना एक लिफाफा मिळाला. या लिफाफ्यात एक पत्र आढळले. या पत्रावरती नक्सलवाद सप्ताह दिवस असे लिहिले असून ‘मी नक्सलवादी बोलतो आम्ही रेवलेस्टेशन चांदा फोर्ट उडवून देणार आहोत नाही तर मूल रेल्वे स्टेशन विस्फोट करणार आहोत’ असे लिहिण्यात आहे. या पत्रानंतर रेल्वे पोलिसांसह पोलीस विभागामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेता चांदा फोर्ट रेल्वे स्टेशन आणि मूल रेल्वे स्टेशनवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच १० ते १५ पोलिसकर्मी रेल्वेत तैनात करण्यात आले असल्याची माहिती आहे. हे पत्र फक्त दहशत पसरविण्यासाठी ठेवण्यात आले आहे कि, नक्सल्यांकडून करण्यात आलेलं हे कृत्य आहे. या दिशेने पोलीस विभागासह रेल्वे पोलीस तपास करत आहे. या बाबत पोलिसांनीही दुजोरा दिला असून संपूर्ण प्रकारावर लक्ष ठेवून असल्याची माहिती देण्यात आली आहे.