बांधकाम विभागाच्या कामाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती

0
8

गोंदिया,दि.29-गोंदिया जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकित जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या जि.प.अध्यक्षांच्या बंगलादुरुस्तीसह इतर निवासस्थानाच्या बांधकामावर झालेल्या खर्चासह इतर कामाची चौकशी करण्यासंबधीची त्रीसदस्यीय चौकशी समिती नेमण्याची घोषणा करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य सुरेश हर्षे यांनी बेरार टाईम्सने प्रकाशित केलेल्या वृत्ताचा आधार घेत मुद्दा उपस्थित केला होता.त्या मुद्यावर इतर सदस्यांनीही हर्षे यांची समर्थेन करीत बांधकाम विभागातील सर्व कामाची चौकशी करण्याची मागणी केली.सोबतच या चौकशी समितीमध्ये बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना सुध्दा ठेवण्यात येऊ नये अशी भूमिका मांडली.त्यावर जि.प.अध्यक्ष व सीईओ यांनी अति.मुकाअ,मुख्य लेखा वित्त अधिकारी यांच्यासह ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील अधिकार्यांची तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे.ही समिती चौकशीला कधी सुरवात करते.आणि वास्तविक चौकशी करुन बांधकामाच्या नावावर शासकीय निधीच्या झालेल्या दुरुपयाेग शोधून काढते की नाही याकडे लक्ष लागले आहे.