ओबीसींचे द्वितीय महाअधिवेशन सोमवार ७ ऑगस्टला नवी दिल्लीत

0
16

सुरेश भदाडे, नवी दिल्ली,दि.06- राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दुसरे राष्ट्रीय महाअधिवेशन उद्या सोमवार ७ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे.या अधिवेशनाच्या निमित्ताने देशाच्या विविध राज्यातील सर्वपक्षीय ओबीसी नेते एकाच मंचावर येणार आहेत.ओबीसी महाधिवेशनासाठी जय्यत तयारी सुरु झाली असून विविध राज्यातून ओबीसी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रतिसाद मिळत आहे.या अधिवेशनाला देशातील ओबीसी पदाधिकारी,कार्यकर्त,अधिकारी,कर्मचारी बांधवानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रिय ओबीसी महासंघातर्फे करण्यात आले आहे.
दिल्लीच्या रफी मार्गावरील कान्स्टीटयुशनल क्लबच्या सभागृहात मंडल आयोग दिनी आयोजित या महाअधिवेशनाचे उद्घाटन माजी न्यायमूर्ती तथा मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष व्ही. ईश्वरैया यांचे हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्षपदी केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर हे राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय अवजड उद्योगमंत्री ना.अनंत गीते, केंद्रीय श्रममंत्री ना.बंडारू दत्तायत्र, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.राजेंद्र गोहाई, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, महाराष्ट्राच्या ग्रामविकास व महिलाबालकल्याण मंत्री पंकजाताई मुंडे, ऊर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे, ओबीसी संसदीय समितीचे अध्यक्ष खासदार गणेश सिंग,राज्यसभा सदस्य देवेंद्र गौड, खासदार नाना पटोले,तेलंगानाचे खासदार बी.नरसय्या गौड,खासदार अली अनवर अंसारी,आमदार सुनील केदार, नवीदिल्लीचे माजी कुलपती डॉ. पी.सी. पतंजली आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीङ्म ओबीसी महासंघाचे संयोजक प्रा.बबनराव ताङ्मवाडे राहणार आहेत. दरम्यान, या अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात भारतीय बहुजन आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व करणारे सामाजिक आणि राजकीय कार्यात अग्रणी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार शरद यादव यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
अधिवेशनाच्या दुसर्या सत्राचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय समन्वयक तथा माजी खासदार डॉ. खुशालचंद्र बोपचे हे राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री ना. अनुप्रिया पटेल, महाराष्ट्राचे पशू,दुग्ध आणि मत्स्य विकासमंत्री ना.महादेव जानकर, खासदार हुकूमदेव यादव, खासदार राजकुमार सैनी, तेलंगाणाचे राज्यसभा खासदार रापोलू भास्कर, के. केशवराव, डी. श्रीनिवासन, माजी खासदार व्ही. हनुमंतराव, महाराष्ट्रातील आमदार विजय वडेट्टीवार, डॉ. परिणय फुके,व्हाईस आॅफ ओबीसीचे संपादक जे पार्थसारथी,ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष इंजि.प्रदिप ढोबळे, बी.सी.सेंटर फार एम्पावरमेंटचे सचिव कस्तुरी जयाप्रसाद हे उपस्थित राहणार आहेत.
या महाअधिवेशनात देशातील ओबीसींच्या सामाजिक व शैक्षणिक स्थितीवर चर्चा होणार असून ओबीसींच्या संवैधानिक हक्कांसाठी लढ्याची दिशा आणि दशा यावर विचारमंथन करण्यात येणार आहे. ओबीसींवर सतत होणाèया अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर हे आयोजन करण्यात आले आहे.या अधिवेशनात 7 आॅगस्टला मंडल आयोग लागू झाल्याने ओबीसी दिवस म्हणून जाहिर करणे,ओबीसींची जनगणना जाहिर करणे,ओबीसींसाठी स्वंतत्र मंत्रालय स्थापन करणे,नाॅन क्रिमिलेयरची असैवधानिक अट रद्द करणे,ओबीसींच्या रिक्त जागा भरण्यासाठी स्वंतत्र विशेष अभियान चालविणे,शेतकयाना वयाच्या 60 वर्षानंतर पेंशन लागू करणे,मंडल आयोग,नच्चीपन कमिटी व स्वामीनाथन आयोगाच्या शिपारशी लागू करणे,ओबीसीसांठी विधानसभा व लोकसभेत स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्यात यावे आदी मागण्यासह ओबीसी आयोगाला सवैधानिक दर्जा देण्यावर चर्चा होणार आहे.या महाधिवेशनाला देशातील सर्व ओबीसी बांधवांना या महाअधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केले आहे.