झेलिया जंगलात पोलिस- नक्षल चकमक, एक नक्षली ठार

0
16

गडचिरोली दि.२४ः- अहेरी उपविभागातील दामरंचा पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील सांड्रा जंगल परिसरात  व धानोरा उपविभागाअंतर्गत येणाºया कटेझरी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील लहान झेलिया जंगल परिसरात आज २४ डिसेंबरला पोलिस नक्षविरोधी अभियान राबवित असताना पोलिस-नक्षल चकमकी उडाली. यात सांड्रा जंगल परिसरात झालेल्या चकमकीत एक नक्षली ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

उपपोलिस स्टेशन दामरंचा नजीक असलेल्या फरसेगड जि. बिजापूर अंतर्गत येणाºया सांड्रा-जारागुडम जंगल परिसरात आज सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास पोलिस नक्षविरोधी अभियान राबवित होते. दरम्यान जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेन गोळीबार केला. पोलिसांनी आत्मसंरक्षणार्थ नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला असता, पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षली जंगलात पसार झाले.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, एका पुरुष नक्षल्याचा मृतदेह व एक १२ बोअर रायफल पोलिसांनी ताब्यात घेतली. मात्र चकमकीत ठार झालेल्या नक्षल्यांची ओळख पटली नसून त्याची ओळख पटविण्याचे काम पोलिसांच्यावतीने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दुसºया घटनेत धानोरा उपविभागांतर्गत येणाºया कटेझरी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीत लहान झेलिया जंगल परिसरात आज सकाळी १० वाजताच्या सुमारास पोलिस नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेन गोळीबार केला. पोलिसांनी नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला असता नक्षली घनदाट जंगलाचा फायदा घेत पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, घटनास्थळावर डेटोनेटर, बॅटरीची सेल, इलेक्ट्रीक वायर आदी साहित्य आढळून आले. पोलिसांनी सदर साहित्य जप्त केले आहे.